Mukesh Ambani Birthday : मुकेश अंबानी यांच्या आयुष्यातील 10 रंजक गोष्टी, ज्या कोणालाच माहित नाहीत

Mukesh Ambani Birthday | मुकेश अंबानी आज 65 वर्षाचे झाले असले तरी त्यांना तरुणांकडून नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

Updated: Apr 19, 2022, 04:50 PM IST
Mukesh Ambani Birthday : मुकेश अंबानी यांच्या आयुष्यातील 10 रंजक गोष्टी, ज्या कोणालाच माहित नाहीत title=

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा आज वाढदिवस आहे. ते आज 65 वर्षांचे झाले आहेत. मुकेश अंबानी हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे आणि जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती ९४.९ अब्ज डॉलर आहे. वडील धीरूभाई अंबानी यांचा वारसा नव्या उंचीवर नेणारे मुकेश अंबानी हे खऱ्या आयुष्यात अगदी साधे आहेत. मुकेश अंबानींचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक होता.

केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत रिलायन्स पेट्रोलियम सुरू केले. त्यानंतर, 1985 मध्ये, कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. पेट्रोलियम व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रातही पुढे पाऊल टाकले आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली.

अंबानींची कंपनी RIL चे मार्केट कॅप सध्या 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यानुसार, जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत ती 42 व्या क्रमांकावर आहे. चला जाणून घेऊया मुकेशच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित 10 रंजक गोष्टी...

1. तुम्हाला कशाची भीती वाटते?

मुकेश अंबानी यांनी एका मुलाखतीत स्वत:शी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यांनी सांगितले होते की ते खूप लाजाळू आहेत आणि ते सार्वजनिकपणे बोलायला घाबरतात.

2. दारु बाबत काय म्हणाले?

जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती असूनही मुकेश अत्यंत साधे जीवन जगतात. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, आजपर्यंत त्यांनी कधीच दारूला हातही लावला नाही.

3. हॉकी खेळायला आवडते:

मुकेश अंबानी यांनी क्रिकेटला खूप प्रोत्साहन दिले. मुंबई इंडियन्स हा त्याचा आयपीएलमधील संघ आहे, पण त्यांचं हॉकीवरही खूप प्रेम आहे. त्यांना हॉकी खेळायला आवडते. शालेय आणि कॉलेजच्या दिवसात ते हॉकी खेळायचे.

4. वडिलांनी मुकेश यांच्यासाठी केली नीता अंबानी यांची निवड:

मुकेश अंबानी आणि नीता यांचा विवाह धीरूभाई अंबानी यांनीच करुन दिला होता. धीरूभाई अंबानींनी नीता यांना पारंपारिक नृत्य कार्यक्रमात पाहिले. यानंतर त्यांनी स्वतः नीता यांना फोन केला. फोनवर आपले नाव सांगताच नीता यांना वाटले की हा प्रँक कॉल आहे. म्हणून त्यांनी सलग दोनदा फोन ठेवला. धीरूभाईंनी तिसऱ्यांदा फोन केला तेव्हा नीता यांच्या वडिलांनी फोन उचलला. दोघांमध्ये संभाषण झाले आणि नीताला भेटण्यासाठी धीरूभाईंनी त्यांच्या कार्यालयात बोलावले.

 5. जेव्हा नीता आणि मुकेश पहिल्यांदा भेटले होते

नीता यांना धीरूभाई अंबानी यांनी डिनरसाठी आमंत्रित केले होते, जिथे त्या पहिल्यांदा मुकेश यांना भेटल्या. एका मुलाखतीत मुकेश अंबानी यांनी सांगितले की, नीता आली तेव्हा ती खूप सुंदर दिसत होती. त्यावेळी मला हे जाणून घ्यायचे होते की आपण लोकांची विचारसरणी कुठपर्यंत पोहोचवतो? आपण आयुष्यभर एकत्र राहू शकतो का? त्याचवेळी नीता यांनी मुलाखतीत सांगितले की, मुकेश अंबानी हे कोणाशीही मोकळेपणाने बोलण्यासाठी वेळ काढतात. ते प्रत्येकासाठी ओपन नसतात.

 6. नीता मुकेशच्या आयुष्यात दुसरी होती

नीता अंबानी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, लग्नाच्या वेळी मुकेश पहिला पॉलिस्टर प्लांट तयार करत होते. तेथे त्यांचं खूप लक्ष होतं. मग लोक मलाही म्हणायचे की नीता... मुकेशच्या आयुष्यात तू दुसरी आहेस. मुकेशसाठी पाताळगंगा प्लांट पहिल्या क्रमांकावर आहे.

7. मुंबईच्या रस्त्यावर पावभाजी खायला आवडते

कोट्यधीश असूनही मुकेश अंबानी यांना मुंबईत रस्त्याच्या कडेला पावभाजी खायला आवडते. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले. मुंबईत रात्री साडेअकरा नंतरचा सर्वात चांगला पदार्थ म्हणजे पावभाजी असे ते म्हणाले होते.

8. रोज लाल गुलाब द्यायचे

पहिल्या भेटीनंतर नीता आणि मुकेश अंबानी एकमेकांना खूप वेळ देऊ लागले. इतकेच नाही तर मुकेश अंबानी रोज सकाळी नीता यांना लाल गुलाब भेट द्यायचे. 

9. ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना प्रपोज

नोव्हेंबर 1984 ची गोष्ट आहे. नीता अंबानी यांनी सांगितले की, रात्रीचे आठ वाजले होते. दोघेही गाडीत सोबत होते. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचवेळी अचानक मुकेश यांनी कार थांबवली आणि प्रपोज केले. मुकेश यांनी विचारले की, तू माझ्याशी लग्न करशील का? त्याचं उत्तर ही मुकेश यांनी लगेच विचारले. त्यावेळी बाहेर रस्त्यावर लोक ओरडत होते. हॉर्न वाजवत होते, पण मुकेश यांनी गाडी हलवली नाही. मला विचारले आता सांग... माझ्याशी लग्न करशील का? आणि मग निता यांनी हो उत्तर दिले.

10. मुकेश तरुणांपासून शिकतात

मुकेश अंबानी अजूनही वाचतात, लिहितात आणि शिकवतात. ते तरुणांकडून नवीन तंत्रज्ञान शिकतात. एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितले.