मुंबई : २०२० हे संपूर्ण वर्ष सगळ्यांसाठी खराब गेलं आहे. हे वर्ष कोरोनाचा काळ म्हणून भयानक ठरलं. पण हे वर्ष काहींना खूप खास ठरलं आहे. भारतात तब्बल 40 अब्जाधीश वाढल्याची बातमी समोर आली आहे. यांच्यासह भारतात एकूण १७७ लोकांची अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. (top 10 wealthy Indians on the list)
२०२० हे संपूर्ण वर्ष कोरोनामुळे अतिशय वाईट ठरलं. मात्र असं असलं तरीही भारतात एकूण ४० अब्जाधीशांमध्ये वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं पुन्हा एकदा भारतातील श्रीमंतांच्या यादीत नाव आलं आहे. २०२० मध्ये अंबानींच्या संपत्तीत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जगातील श्रीमंतांमध्ये मुकेश अंबानींचा आठवा क्रमांक लागतं आहे.ऍलन मस्क जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. हुरन ग्लोबल रिच लिस्ट २०२१ ने जगातील श्रीमंतांची ताजी यादी नुकतीच जाहीर केली. त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
१. मुकेश अंबानी - Reliance Industries Limited
२. गौतम अडानी - Adani Group
३. शिव नादर - HCL Technologies
४. लक्ष्मी मित्तल - ArcelorMittal
५. सायरस पुनावाला - Serum Institute of India
६. हिंदुजा ब्रदर्स - Hinduja Group
७. उदय कोटक - Kotak Mahindra Bank
८. राधाकिशन दमानी - Avenue Supermarts
९. जय चौधरी - Zscaler
१०. दिलीप संघवी आणि फॅमिली - Sun Pharmaceutical Industries
Richest people in the world:
1.Jeff Bezos
2.Elon Musk
3.Bernard Arnault
4.Bill Gates
5.Mark Zuckerberg
6.Warren Buffett
7.Larry Page
8.Larry Ellison
9.Sergey Brin
10.Mukesh Ambani-Forbes
— Norbert Elekes (@NorbertElekes) February 27, 2021
गुजरातचे उद्योगपती गौतम अडानी यांच्या संपत्तीत देखील वाढ झाली आहे. २०२० मध्ये त्यांची संपत्ती ३२ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली आहे. जगभरातील श्रीमंतांच्या यादीत त्यांचा ४८ वा क्रमांक आहे. मुकेश अंबानी यांच्यानंतर ते दुसरे श्रीमंत भारतीय ठरले आहे. हा रिपोर्ट १५ जानेवारीपर्यंत केलेल्या अहवालानुसार, व्यक्तीगत आणि कौटुंबिक संपत्तीनुसार यांची माहिती दिली आहे. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेच्या चालू आर्थिक वर्षात सात टक्के घसरण येण्याची शक्यता वर्तवली होती. गेल्या वर्षी कोरोनापासून वाचण्यासाठी देशभरात सरकारने लॉकडाऊन केलं होतं. तरी देखील या व्यक्तींच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे.