फोर्ब्स यादी : देशात सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, दुसरे अदानी

सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी याचे पहिले स्थान आहे. 

Updated: Oct 12, 2019, 02:00 PM IST
फोर्ब्स यादी : देशात सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी, दुसरे अदानी

मुंबई : देशात सर्वाधिक श्रीमंत कोण, असा कोणी प्रश्न विचारला तर उत्तर मिळेल उद्योगपती मुकेश अंबानी.  फोर्ब्सने जाहीर केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी याचे पहिले स्थान आहे. तर आठव्या स्थानावरुन थेट दुसऱ्या स्थानावर उद्योपती गौतम अदानी यांनी मोठी झेप घेतली असून ते श्रीमंताच्या यादीत दुसरे आहेत.

श्रीमंतांची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. यात उद्योजक हिंदूजा बंधू, बांधकाम क्षेत्रातील पलोनजी मिस्त्री, बँकर उदय कोटक, तंत्रज्ञान क्षेत्रातील शीव नादार, गुंतवणूकदार राधाकृष्ण दमानिया, गोदरेज कुटुंबिय, पोलाद उद्योजक लक्ष्मी मित्तल, उद्योजक कुमार बिर्ला यांचा समावेश आहे.

मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही ५१.४ बिलियन डॉलर (सुमारे ३ लाख ७० हजार कोटी) इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती १५.७ बिलियन डॉलर (सुमारे १ लाख १५ हजार कोटी) इतकी आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या दहामध्ये  सहा जणांचा समावेश करण्यात आला आहे. यात बायजू या अॅपचे संस्थापक बायजू रवींद्रन, हल्दीरामचे मनोहर लाल आणि मधुसूदन अग्रवाल, टाइल्स आणि अन्य उत्पादने करणारी जॅग्वार या कंपनीचे मालक राजेश मेहरा यांचा पहिल्यांदाच अव्वल १०० श्रीमंतांमध्ये समावेश आहे.

श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अझीम प्रेमजी यांची दुसऱ्या स्थानावरुन १७ व्या स्थानावर घसरण झाली आहे.  मार्च महिन्यामध्ये प्रेमजी यांनी गरीब, वंचितासाठी देण्यात येणाऱ्या देणगीमध्ये तब्बल ५२,७५० कोटी रुपयांची वाढ केल्याने श्रीमंत व्यक्तीच्या यादीत  त्यांची  घसरण झाल्याचे दिसत आहे.