मराठा आरक्षण खटला : 'महागड्या' मुकूल रोहतगींची उचलबांगडी

खासदार संभाजीराजे यांनी मात्र मराठा आरक्षण प्रकरणात सरकारी वकील मुकूल रोहतगी यांना हटवण्यावरून आपली नाराजी व्यक्त केलीय

Updated: Dec 18, 2019, 07:41 PM IST
मराठा आरक्षण खटला : 'महागड्या' मुकूल रोहतगींची उचलबांगडी title=

मुंबई : राज्यातील सरकार बदलल्यानंतर मराठा आरक्षण प्रकरणात एक ट्विस्ट पाहायला मिळतोय. उद्धव ठाकरे सरकारनं मराठा आरक्षणाचा खटल्यातील सरकारी वकील मुकूल रोहतगी यांना हटवण्याचा निर्णय घेतलाय. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मुकूल रोहतगी यांची मराठा आरक्षण प्रकरणात सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, आज (बुधवारी) सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या मराठा आरक्षण सुनावणी दरम्यान ऍड. मुकूल रोहतगी आणि ऍड. नाडकर्णी उपस्थित नव्हते.

मुकूल रोहतगी यांना हटवण्यासंदर्भात स्पष्टीकरण देताना मुकूल रोहतगी हे खूप 'महागडे' वकील असल्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलंय. राज्याकडे इतके पैसे नसल्यानं मराठा आरक्षण प्रकरणातून मुकूल रोहतगी यांना बाजुला केल्याचं सरकारनं म्हटलंय. 

खासदार संभाजीराजे यांनी मात्र मराठा आरक्षण प्रकरणात सरकारी वकील मुकूल रोहतगी यांना हटवण्यावरून आपली नाराजी व्यक्त केलीय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केलीय.