शिवसेनेचा अदानी इलेक्ट्रिसिटीला गंभीर इशारा

वीज बिलात दरवाढ दिसली तर मुंबईत एकही कलेक्शन सेंटर चालू देणार नाही, असा गंभीर इशारा शिवसेनेने अदानी इलेक्ट्रिसिटीला दिलाय. 

Updated: Dec 6, 2018, 06:46 PM IST
शिवसेनेचा अदानी इलेक्ट्रिसिटीला गंभीर इशारा

मुंबई : पुढील महिन्यात वीज बिलात दरवाढ दिसली तर मुंबईत एकही कलेक्शन सेंटर चालू देणार नाही, असा गंभीर इशारा शिवसेनेने अदानी इलेक्ट्रिसिटीला दिलाय. विधान परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अॅड. अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली आज वांद्रे पूर्व येथील अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी शिवसैनिकांनी वीज बिलांची होळी करीत आपला निषेध व्यक्त केला.

वीज दर नियामक आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटीला दरवाढीची परवानगी दिली नसताना सध्या केलेल्या वीज दरवाढीमागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल आहे, असा संशय यावेळी परब यांनी व्यक्त केला. दरम्यान, या धडक मोर्चाने अदानी इलेक्ट्रिसिटीला आज 240 व्हॉल्टचा झटका दिलाय. यापुढे 460 व्हॉल्टचा झटका द्यायला शिवसेना मागे-पुढे पाहणार नाही, असा सूचक इशाराही या परब यांनी आंदोलनावेळी अदानी इलेक्ट्रिसिटी  व्यवस्थापनाला दिला आहे.