गोरेगावमध्ये इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

Updated: May 28, 2018, 12:52 PM IST

मुंबई : मुंबईतल्या गोरेगावमधल्या एस व्ही रोडवरच्या आर बी एल बिल्डिंगमधल्या अगितांडवात, तिघांचा होरपळून मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झालेत. संध्याकाळी पाचच्या सुमाराला लागलेल्या या आगीवर तब्बल पाच तासांनंतर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.

गोरेगाव परिसरात असलेल्या  आर. बी. एल. इमारतीला दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १४ गाड्या दाखल झाल्या आणि तब्बल पाच तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं.