मुंबईतल्या बो मोंड इमारतीला लागलेली आग आटोक्यात

इमारतीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही घर

Updated: Jun 13, 2018, 07:03 PM IST

मुंबई : मुंबईत प्रभादेवीतल्या बो मोंड या ३३ माळ्यांच्या रहिवासी इमारतीला लागलेली आग विझवताना दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. तब्बल चार तासांनंतर ही आग आटोक्यात आली.  आप्पासाहेब मराठे मार्गावर ही इमारत आहे. या इमारतीतल्या ३२ आणि ३३ व्या मजल्यावर आग लागली. या इमारतीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणचंही घर आहे. जवळपास ९६ रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलंय. आगीमुळे या इमारतीच्या काचा निखळून पडल्यायत. महत्त्वाचं म्हणजे या इमारतीच्या ३३व्या मजल्यावर आग लागली होती.