मुंबई : पाकमोडिया मार्गावर गुरुवारी कोसळलेल्या इमारतीत मृतांचा आकडा ३३ वर जाऊन पोहोचल्याची माहिती बीएमसीने म्हटलेय. या दुर्घटनेत १७ जण जखमी असून त्यांच्यावर जेजे आणि सैफी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, बचावकार्य मोहीम थांबविण्यात आलेय.
अग्निशमन दल, आणि एनडीआरएफचे जवान ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना काढण्याचं काम आता थांबवण्यात आले आहे. काल सकाळी मुंबईतल्या भेंडीबाजार भागातली हुसैनी नावाची ११७ वर्ष जुनी इमारत कोसळली. तेव्हापासून ढिगाऱ्याखालून माणसं काढण्याचं काम सुरू होतं. आज सकाळी १०च्या सुमारास हे काम थांबवण्यात आलं.
या कामात एनडीआरएफच्या दोन तुकड्या रात्रंदिवस काम करत होत्या. त्यांना मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांचीही पुरेपूर साथ होती. मदत आणि बचावकार्यानंतर परिसरातल्या सर्व इमारतीचा सर्व्हे करून पुनर्विकासाचा आढावा घेतल जाईल, असं या भागाचे आमदार अमीन पटेल यांनी म्हटले आहे.