मुंबई : मुंबईत आज झालेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली (Central Railway Disturb) आहे. लोकल वाहतूक उशिराने धावत असून अनेक लोकल जवळपास 40 ते 45 मिनिटांपासून एकाच ठिकाणी थांबली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे रुळावर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. कल्याण, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत आहेत. (Due to heavy rains central railway local Trains running late.)
बुधवारी संध्याकाळी अचानक आलेल्य़ा पावसामुळे मध्य रेल्वेने केलेल्या कामांचा दावा पुन्हा एकदा फोल ठरला आहे. काही तास पडलेल्या पावसाचा पुन्हा एकदा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. त्यामुळे घरी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. मुंबईत काही ठिकाणी पाऊस सुरु आहे.
Due to heavy rains, local Trains on Mainline are running 25-30 minutes late.
— Central Railway (@Central_Railway) September 8, 2022
मुंबईत दादर, गोरेगाव, घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. काही ठिकाणी रुळावर पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. (Heavy rain in Mumbai)
रेल्वे रुळांवरही पाणी जमा (water logging on railway tracks) झाले आहे. यामुळे रेल्वे वाहतूक मंदावली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण, कर्जत, कसाराकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.
ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची तारांबळ उडाली. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी पहायला मिळत आहे. लोकलमध्ये गर्दी असल्याने देखील प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.