बलात्काराच्या आरोपाची साक्ष फिरवली, तरुणीला २ लाखांचा दणका

बलात्कार झाल्याच्या आरोपाची साक्ष फिरवल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं तरुणीलाच दणका दिला आहे.

Updated: Nov 19, 2018, 11:19 PM IST
बलात्काराच्या आरोपाची साक्ष फिरवली, तरुणीला २ लाखांचा दणका title=

मुंबई : बलात्कार झाल्याच्या आरोपाची साक्ष फिरवल्या प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयानं तरुणीलाच दणका दिला आहे. त्या तरुणीला पीडित म्हणून देण्यात आलेली नुकसान भरपाई परत करण्याचे निर्देश सत्र न्यायालयानं दिले आहेत. अशा प्रकारचा हा पहिलाच निकाल ठरला आहे. २०१५ साली १७ वर्षीय मुलगी तिच्या शेजारी राहत असलेल्या मुलासोबत पळून गेली होती. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलगी घरी आल्यानंतर ती गर्भवती असल्याचं लक्षात येताच बलात्काराचा गुन्हा दाखल केला गेला.

यावेळी मुलगी अल्पवयीन असल्याने तीला मनोधैर्य योजनेअंतर्गत २ लाख रूपये मिळाले होते. मात्र न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर या मुलीनं तिची साक्ष फिरवली, आणि आपल्यावर बलात्कार झालाच नसल्याचं न्यायालयात सांगितलं. बलात्काराचा आरोप असलेल्या मुलावर आपलं प्रेम असून त्याच्यासोबत आपण लग्न केले आहे. आम्हा दोघांना एक मूल असल्याचंही तिने न्यायालयाला सांगितलं.