मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर अखेर राजकारणाची बाजी!

अखेर अमोल काळे यांचा विजय झाला आहे. 

Updated: Oct 20, 2022, 08:48 PM IST
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर अखेर राजकारणाची बाजी! title=

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूकीचा निकाल अखेर आज लागलाय. यामध्ये अखेर अमोल काळे यांचा विजय झाला आहे. काळे यांच्या रूपाने एमसीएला एक नवे अध्यक्ष लाभले आहेत. मुंबईटच्या वानखेडे स्टेडियमवर ही निवडणूक घेण्यात आली होती. 300 हून अधिक मतदारांनी यावेळी मतदान केलं. मुख्य म्हणजे यावेळी महाराष्ट्रातील विविध पक्षांचे राजकारणी मंडळी एकाच मंचावर पहायला मिळाले. 

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या पॅनलने एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी भारतीय कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत रंगली होती. मात्र अखेर या निवडणूकीत काळे यांनी बाजी मारलीये. त्यांनी संदिप पाटील यांचा पराभव केला आहे.

यांनी बजावला मतदानाचा हक्क

संदीप दळवी (MNS)
प्रसाद लाड (BJP)
विहंग सरनाईक (शिंदे गट)
प्रताप सरनाईक (शिंदे गट)
विजय पाटील - (Congress) 
जितेंद्र आव्हाड - (NCP)
शरद पवार -(NCP)
पंकज ठाकूर -( BVA) 
निलेश भोसले - (शिवसेना उद्धव गट)
मिलिंद नार्वेकर - (SS)
आशिष शेलार - (भाजप)
राहुल शेवाळे - (शिंदे गट)
क्षितीज ठाकूर - (बविआ)
सचिन अहिर - (शिवसेना ठाकरे गट)
रामदास आठवले - (आरपीआय)

ठाकरे कुटुंबीयांनी मतदानाला दांडी

मुख्य म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य आणि तेजस या तिघांना मतदानाचा हक्क होता. मात्र या तिघांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. दरम्यान यानंतर ठाकरे कुटुंबियांवर पुन्हा एकदा भाजपकडून टीका करण्यात आली.