धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले, 2 चिमुरड्यांचा समावेश

मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, हत्या की आत्महत्या याचा तपास सुरु

Updated: Jul 29, 2022, 03:07 PM IST
धक्कादायक! मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळले, 2 चिमुरड्यांचा समावेश title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मुंबईत एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईच्या शिवाजीनगरमधल्या बैंगनवाडी भागात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

मुंबईच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रस्ता क्रमांक 14 बैगन वाडी या वसाहतीत सकाळी हा प्रकार उघडकीस आला , घटनेची माहिती मिळताच पोलिसानि घटना स्थळी धाव घेत पंचनामा केलाय. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांची दोन मुले असल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. 

शकील जलील खान (वय 34), राबिया शकील खान  (वय 25), सरफ़राज़ शकील खान (वय  7) आणि अतिफा खान (वय 3) हे सर्व एकाच कुटुंबातील आहे. ही आत्महत्या आहे की की हत्या याचा तपास पोलीस करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार शकील खानने आपली पत्नी आणि मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी.

हे चारही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी राजावाडी शव विच्छेदन गृहात पाठवले आहे , पोलिसांनी या बाबत अपघाती नोंद केली असुन पुढील तपास करत आहेत.