लॉकडाऊनमध्ये डब्बेवाल्यांचा व्यवसाय ठप्प; मदतीचं आवाहन

गेल्या 130 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या काळापर्यंत लॉकडाऊनमुळे दब्बेवाल्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे.

Updated: Apr 12, 2020, 03:19 PM IST
लॉकडाऊनमध्ये डब्बेवाल्यांचा व्यवसाय ठप्प; मदतीचं आवाहन title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : मुंबईतील डब्बेवाले सध्या कोरोनामुळे असलेल्या लॉकाडाऊनमुळे मोठ्या अडचणीत आहेत. डब्बेवाल्यांनी ते लॉकडाऊनचा स्वीकार करत असल्याचं सांगितलंय. मात्र, डब्बेवाल्यांचा व्यवसाय व्यवसायिक, नोकरदार, इतर ग्राहकांवर अवलंबून असतो. डब्बा देणंच बंद असेल, जर ग्राहकच नसेल तर आपलं पोट कसं भरायचं अशी गंभीर समस्या त्यांच्यासमोर उभी आहे. त्यामुळे डब्बेवाल्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

डब्बेवाल्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या 130 वर्षांमध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या काळापर्यंत लॉकडाऊनमुळे त्यांनी आपली सेवा बंद ठेवली आहे. मदतीचं आवाहन करत डब्बेवाल्यांनी तुमची एक छोटीशी मदत, एका डब्बेवाल्याचं कुटुंब वाचूव शकत असल्याचं सांगितलंय. 

जवळपास 5 हजार डब्बेवाले 2 लाख लोकांना डब्बा पोहचवण्याचं काम करतात. डब्बेवाल्यांनी त्यांच्या संस्थेला आर्थिक मदत करण्यासाठी संपूर्ण डिटेल्स दिले आहेत. Mumbai Dabba wala Association चे अध्यक्ष उल्हास मुके यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक बँकेतील खात्यात मदत करु शकतात.

बँकेचे डिटेल्स खालीलप्रमाणे -

Dena Bank
Dadar west Branch
Account number-001010001442
IFSC :- BKDN0450010
Account holder :- NUTAN MUMBAI TIFFIN BOX  SUPPLIERS CHARITY TRUST
919870419916

मुंबई डब्बावाला असोसिएशन एक 'रोटी बँक'ही चालवतात. या 'रोटी बँक'द्वारे रुग्णालयात इलाज करण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबियांना मोफत जेवण दिलं जातं. 

मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसागणिक वाढतोच आहे. देशात 14 एप्रिलपर्यंत 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र मुंबईसह महाराष्ट्रात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा 1895वर पोहचला आहे. त्यामुळे मुंबई आता रेड झोनमध्ये आली असून रुग्णांची वाढती संख्या मुंबईसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.