Mumbai Drug Case : Aryan Khan बरोबर अटक केलेले 8 जण कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती

ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan)आणखी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. हे लोक कोण आहेत, ते कोठे राहतात आणि काय करतात हे तपशीलवार जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा  

Updated: Oct 5, 2021, 01:58 PM IST
Mumbai Drug Case : Aryan Khan बरोबर अटक केलेले 8 जण कोण आहेत? जाणून घ्या त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती title=

नवी दिल्ली :  नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शनिवारी मुंबईत सुरू असलेल्या एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीवर (Rave Party) छापा टाकला. याप्रकरणी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. या सर्वांची रविवारी संध्याकाळपर्यंत चौकशी करण्यात आली त्यानंतर शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानसह (Aryan Khan) सर्वांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेले हे 8 जण कोण आहेत हे जाणून घेऊया

मुनमुन धमेचा 
मुनमुन धमेचा (Munmun Dhamecha) एक मॉडेल आहे. 39 वर्षांच्या मुनमुनला एनसीबीने (NCB) 3 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता अटक केली. मुनमुन मध्य प्रदेशमधल्या (MP) सागर जिल्ह्यात राहणारी असून ती उद्योगपती कुटुंबातील आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये तिच्या कुटुंबातील कुणीही राहत नाही. मुनमुनच्या आईचं गेल्या वर्षी निधन झालं, तर वडिलांचंही काही वर्षांपूर्वी निधन झालं आहे. मुनमुनचा भाऊ प्रिंस धमेचा दिल्लीत नोकरी करतो. मुनमुनने आपलं शालेय शिक्षण सागरमध्येच पूर्ण केलं. सहा वर्षांपूर्वी आपल्या भावासोबत मुनमुन दिल्लीत स्थायिक झाली. 

नूपुर सारिका
नूपुर सारिका (Nupur Sarika)दिल्लीत लहान मुलांची शिक्षिका म्हणून काम करते. नूपुरला मोहकने ड्रग्स दिल्याची माहिती आहे. हे ड्रग्स सॅनेटरी पॅड्समध्ये लपवून नूपुर रेव पार्टीत आली होती. एनसीबीने (NCB) नूपुरकडून ड्रग्स जप्त केले.

इशमित सिंह 
इशमित सिंह (Ishmeet Singh) दिल्लीत राहणार आहे. दिल्लीत इशमितचा हॉटेल व्यवसाय आहे. रेव पार्टीत एनसीबीने (NCB) इशमितकडून 14 MDMA Ecstasy Pills जप्त केले.

मोहक जसवाल
मोहक जसवालही (Mohak Jaswal) दिल्लीत राहणारा आहे. मोहक पेशाने आयटी (IT) प्रोफेशनल आहे. काही वर्ष त्याने परदेशात नोकरी केली. मोहकने मुंबईतील एका स्थानिक व्यक्तीकडून ड्रग्स खरेदी केल्याची माहिती आहे. खरेदी केलेलं ड्रग्स त्याने नूपुरला दिलं होतं.

विक्रांत छोकर
विक्रांत छोकरसुद्धा (Vikrant Chhoker) दिल्ली निवासी आहे. विक्रांत ड्रग एडिक्टेड असल्याची माहिती मिळतेय. विक्रांत बऱ्याचदा मनाला क्रीम आणि गोव्यात जाऊन ड्रग्स घेत असल्याची माहिती पुढे आली आहे. विक्रांतकडून एनसीबीने 5 ग्राम Mephedrone (Intermediate Quantity), 10 ग्राम cocaine (intermediate) ड्रग्स  जप्त केले आहेत.

गोमित चोपड़ा
गोमित चोपड़ा (Gomit Chopra) दिल्लीत प्रसिद्ध फॅशन मेकअप आर्टिस्ट आहे. दिल्लीतील अनेक मोठे सेलिब्रेटि त्याचे ग्राहक आहेत. गोमितने रेव पार्टीत eye लेंसेस बॉक्समधून ड्रग्स आणले होते. एनसीबीने गोमितकडून 4 MDMA Pills आणि काही प्रमाणात कोकेन जप्त केलं.

अरबाज मर्चेंट
अरबाझ मर्चेंट (Arbaaz Merchantt) शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा शालेय मित्र आहे. याआधीही आर्यन आणि अरबाझने अनेक पार्ट्यांमध्ये सहभाग घेतला आहे. एका मोठ्या सेलिब्रेटीच्या मुलीबरोबर अरबाझचे व्हॉट्सअॅप चॅट एनसीबीच्या हाती लागले आहे. एनसीबीने अरबाझकडून 6 ग्राम चरस जप्त केलं आहे. रेव पार्टीत अरबाझला महागडा कॉम्प्लिमेंट्री रुम देण्यात आला होता.

श्रेयस नायर 
श्रेयस नायर (Shreyas Nayar) मुंबईतल्या गोरेगाव परिसरात राहतो. रेव पार्टीत वेग-वेगळे ग्रुप पार्टी करत होते, त्यातील एका ग्रुपला श्रेयसने ड्रग्स पुरवले होते. श्रेयसही या पार्टीत जाणार होता. पण काही कारणाने तो पार्टीत पोहचू शकला नाही. पार्टी आयोजन करणाऱ्यांपैकी एक श्रेयस आहे. याशिवाय श्रेयस आर्यन खान आणि अरबाझचा मित्रसुद्धा आहे.

आर्यन खान 
आर्यन खानला (Aryan Khan) तर सर्वच ओळखतात. आर्यन बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आहे. आर्यनला रेव पार्टीतून अटक करण्यात आली होती. त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे.