प्रभाकर साईलचे आरोप भोवणार? समीर वानखेडे यांना दिल्लीहून बोलावणं

आर्यन खानचं ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल याने केला आहे

Updated: Oct 25, 2021, 02:32 PM IST
प्रभाकर साईलचे आरोप भोवणार? समीर वानखेडे यांना दिल्लीहून बोलावणं

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला (Mumbai Cruize Drugs Bust Case) नवं वळण लागलं आहे. आर्यन खानचं (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने केला आहे. प्रकरण दाबण्यासाठी 18 कोटींची डील झाली होती आणि त्यातले 8 कोटी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना दिले जाणार होते असा गंभीर आरोप प्रभाकर साईलने केला आहे. 

या प्रकरणाची गंभीर दखल एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने घेतली आहे. एनसीबीचे मुख्य अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी एनसीबीचे zonnal Director समीर वानखेडे यांना तातडीने दिल्लीला बोलावलं आहे. वानखेडे यांची खात्यांर्गत चौकशी होण्याची शक्यता आहे. समीर वानखेडे आजच दिल्लीला रवाना होणार आहेत. या प्रकरणात करण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांप्रकरणी ही चौकशी होण्याची शक्यता आहे.

समीर वानखेडे एनसीबीच्या महासंचालकांपुढे आपली बाजू मांडणार आहेत. याप्रकरणी एनसीबी महासंचालक नेमकी काय भूमीका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

नवाव मलिक यांचा आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी समीर वानखेडे यांच्यावर आज आणखी एक आरोप केला आहे. समीर वानखेडेच्या संदर्भातील  ट्वीट नवाब मलिक यांनी केले आहे. लागोपाठ केलेल्या दोन ट्वीटमध्ये त्यांनी दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटात समीन वानखेडेंचा फोटो ट्वीट करत त्यांनी पहचान कौन? अशा आशयाचे ट्वीट आहे. हा फोटो वानखेडेंच्या पहिल्या लग्नाचा आहे.त्या आधी आणखी एक ट्वीट करतांना वानखेडेंच्या जन्मदाखली ट्वीट केला आहे. 

वानखेडे यांचा जन्माचा दाखल ट्विट केला असून समीर दाऊद वानखेडे यांचा इथून सुरू झाला बोगसपणा (फर्जीवाडा) असे ट्विट केले आहे. या जन्माच्या दाखल्यावर खाडाखोड केलेली दिसून येत आहे.

या प्रकाराला आपण आव्हान देणार असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटल आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेला जन्म दाखला खोटा असल्याचा दावा वानखेडेंनी केला आहे. लवकरच जाहीर खुलासा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.