मुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त

सायन रुग्णालय परिसरात सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली.  

ANI | Updated: Apr 19, 2019, 07:43 AM IST
मुंबईत पुन्हा रोकड सापडली, बारा लाख रुपये जप्त title=

मुंबई : सायन कोळीवाडा परिसरात १७ एप्रिलला निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकांनं कारवाई करत ११ लाख ८५ हजार रुपयांची संशयीत रोकड जप्त केली होती. बुधवारी निवडणूक अधिकारी सायन रुग्णालय परिसरात गस्त घालत असताना एका कार त्यांना रसत्याच्या कडेला संशायास्पद रित्या उभी दिसली. गाडीतील तिघांची चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर सुमारे बारा लाखरुपयांची रोकड आढळली. याप्रकरणी आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून पूढील चौकशी सुरू आहे.  

दरम्यान अचारसंहितेच्या काळात जप्त करण्यात आलेल्या पैशामध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. एक लाखांपेक्षा जास्त पैसे जवळ बाळगण्यास बंदी आहे. कारमध्ये दयाराम हरीराम जैस्वाल, अजितकुमार बलराज शाह आणि अनुराग कुमार शाह हे तिघे होते. त्याच्याकडे ११ लाख ८५ हजार रुपये रक्कम आढळून आली. याबाबत आयकर विभागाला कळविण्यात आले. आयकर विभागाचे उपआयुक्त चौकशी करीत आहेत, अशी माहिती मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.