महत्त्वाचे मुद्दे
Paternity Leave Job News : नोकरीच्या ठिकाणी महिला वर्गाला आणि काही संस्थांमध्ये पुरुषांनाही पॅटर्निटी लिव्हचा अधिकार दिला जातो. महिलांना मिळणाऱ्या या मातृत्वं रजांच्या प्रकरणामध्ये त्यांचा Probation Period अडथळा ठरू नये असं स्पष्ट करत महाराष्ट्र प्रशासकीय लवाद अर्थात Maharashtra Administrative Tribunal नं राज्य शासनाचा मातृत्वं रजा नाकारणारा 2015 चा एक आदेश रद्द केला.
नेमकं प्रकरण काय?
2013 मध्ये महिलेनं नोकरीच्या प्रोबेशन काळात घेतलेली 180 दिवसांची मातृत्व रजा विशेष सुट्टी म्हणून मंजूर करण्यात आली. त्याशिवाय बाळाच्या जन्मानंतर 43 दिवसांची वाढीव रजा घेतल्याचंही दर्शवण्यात आलं. जवळपास 10 वर्षांनंतर सरकारनं दिलेल्या माहितीनुसार त्यांचा प्रोबेशन काळ 2014 ऐवजी 2015 मध्ये संपल्याचं स्पष्ट केलं. इथं महिलेच्या Paternity leave चा काळ विचारात न घेतल्यामुळं नोकरीच्या ठिकाणी तिच्या हुद्द्यावर, सेवाज्येष्ठतेवर याचे परिणाम दिसून आले. या 28 वर्षीय सहायक वनसंरक्षक महिलेच्या मातृत्व रजेचा लाभ नाकारणारा राज्य शासनाचा 2015 मधील तोच आदेश मॅटनं आता रद्द केला.
प्रगतीशील आणि कल्याणकारी मार्गावर असणाऱ्या राज्यात महिलांना 180 दिवसांच्या मातृत्व रजेची हमी देण्यात आल्याची बाब अधोरेखित करत मातृत्व हा नैसर्गिक आणि मूलभूत अधिकार असून, त्यामुळं महिलेच्या नोकरीतील पदावर आणि कार्यकाळावर याचा परिणाम होऊ नये असं मॅटकडून शासनाला स्पष्टपणे बजावण्यात आल्याचं मॅट सदस्या मेधा गाडगीळ यांनी निकालपत्रात स्पष्ट केलं.