मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले, इमारतीचा इतिहास जाणून घ्या

Mumbai High Court : आता एक चांगली बातमी. मुंबई उच्च न्यायालयात हेरिटेज वॉक अनुभवता येणार आहे. (Heritage Walk in Mumbai High Court)  

Updated: Oct 16, 2021, 09:34 AM IST
मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले, इमारतीचा इतिहास जाणून घ्या
संग्रहित छाया

मुंबई : Mumbai High Court : आता एक चांगली बातमी. मुंबई उच्च न्यायालयात हेरिटेज वॉक अनुभवता येणार आहे. (Heritage Walk in Mumbai High Court) आजपासून न्यायालयाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहेत. (Mumbai High Court doors open to tourists) त्यामुळे न्यायालयाच्या इमारतीचा इतिहास अनुभवता येणार आहे. तर सर्वसामान्यांना आता पूर्ण कोर्टाची सफर करता येणार आहे. (Mumbai High Court doors open to tourists, learn the history of the building)

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हटलं जाते. मात्र, आता काळ बदलला आहे. सामान्यांना आता पूर्ण न्यायालयाची चक्क सफरच करता येणार आहे. देशातील जुन्या आणि प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे आजपासून पर्यटकांसाठी खुले झाले आहेत.

तसेच पर्यटन संचालनालय मुंबई उच्च न्यायालय आणि पर्यटक मार्गदर्शक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च न्यायालयाच्या इमारतीचा इतिहास पर्यटकांना अनुभवता आणि जाणून घेता येणार आहे.