Video : ऐतिहासिक ताज हॉटेलची सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त रुम कशी दिसते? मुक्कामासाठी किती रुपये मोजावे लागतात?

Hotel Taj mahal Palace Mumbai : हॉटेल ताज महाल पॅलेसमध्ये एका रात्रीच्या मुक्कामासाठी किती रक्कम मोजावी लागते, इथं सर्वात महागड्या रुमसाठी एका रात्रीचं भाडं किती? पाहून बांधाल स्वप्नांचे बंगले... 

सायली पाटील | Updated: Aug 31, 2024, 12:18 PM IST
Video : ऐतिहासिक ताज हॉटेलची सर्वात महाग आणि सर्वात स्वस्त रुम कशी दिसते? मुक्कामासाठी किती रुपये मोजावे लागतात? title=
Mumbai hotel taj mahal palace costliest and cheapest room cost per night tarrif video travel facts

Hotel Taj mahal Palace Mumbai : स्वप्नांचे बंगले बांधणं म्हणजे नेमकं काय, हे आजवर अनेक चित्रपटांमधून दाखवण्यात आलं आहे. किंबहुना प्रत्यक्ष जीवनातही तुम्हीम्ही अनेकदा असे स्वप्नांचे बंगले बांधले असतील. असंच एक स्वप्न किंवा मनीची इच्छा म्हणजे, मुंबईची शान आणि शब्दश: या शहरातील रत्न असा उल्लेख केल्या जाणाऱ्या 'ताज महाल पॅलेस' या हॉटेलमध्ये जाण्याची, तिथं एक तरी रात्र मुक्काम करण्याची. पण, ही इच्छा किती महागात पडेल माहितीये? 

सोशल मीडियावर या आलिशान आणि पंचतारांकित हॉटेलची अधिकृत माहिती आहेच पण, नुकतंच एका सोशल मीडिया इंफ्लुएन्सरनं भारतातील या सर्वात जुन्या आणि सर्वात अग्रस्थानी असणाऱ्या Hotel Chain मधील मुख्य वास्तू अर्थात हॉटेल जात महाल पॅलेस इथं वास्तव्यास नेमके किती रुपये खर्च करावे लागतात यावरून पडदा उचलला आहे. 

'himynamenispriya' नावाचं (Instagram) इन्स्टा हँडल असणाऱ्या या तरुणीनं मुंबईतील (Mumbai) तब्बल 120 वर्षे जुन्या ताज महाल हॉटेलमध्ये (Hotel Taj Mahal Palace) सर्वात स्वस्त रुममध्ये राहत त्या रुमची झलक आणि हा सुरेख अनुभव नेटकऱ्यांच्या भेटीला आणला आहे. रुममध्ये प्रवेश केल्या क्षणापासून तिनं प्रत्येक गोष्टीची झलक व्हिडीओमध्ये दाखवली आहे. इतकंच नव्हे, तर तिनं या आलिशान हॉटेलमधील सर्वात महागडी रुम किती किमतीला आहे आणि त्या रुमची वैशिष्ट्य काय आहेत यावरूनही पडदा उचलला. 

एका रात्रीसाठी मुक्काम करायचा झाल्या महागड्या रुमसाठी मोजावे लागतात 50 लाख 

ऐकून किंवा वाचून विश्वास बसणार नाही. पण, या इन्फ्लुएन्सरच्या माहितीनुसार टाटा सुईट ही हॉटेल ताज महाल पॅलेसमधील सर्वात महागडी रुम आहे. हे एक आलिशान आणि सर्व सुविधा असणारं अपार्टमेंट असून, इथं बेडरूम, कॉन्फरन्स रुम, ऑफिस, डायनिंग रुम, लिविंग रुम अशा खोल्या आहेत. जुन्या फर्निचरनं या रुमला खास टच देण्यात आला असून, या खोलीतून गेट वे ऑफ इंडियाचं सुरेख रुप पाहता येतं. 

हेसुद्धा वाचा : मुंबईतील 'ताज हॉटेल'मध्ये चहा प्यायला जायचंय? पण इथं कितीला मिळतो चहा? कोणते पदार्थ आहेत Menu मध्ये जाणून घ्या

Mumbai hotel taj mahal palace costliest and cheapest room cost per night tarrif video travel facts

आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे नेते, राष्ट्रप्रमुख, आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटी यांच्यासाठी या रुममध्ये राहण्याची व्यवस्था केली जाते. हल्लीचच म्हणावं तर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नानिमित्त या हॉटेलमधील सर्व रुम बुक करण्यात आले होते. इतकंच नव्हे, तर किम कार्दशियनही याच हॉटेलमध्ये थांबली होती आणि इथं ती तब्बल 50 लाख रुपये किमतीच्या टाटा सुईटमध्ये राहिली होती.