पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?

Mumbai Local Train Update: पश्चिम रेल्वेवर पुन्हा एकदा ब्लॉक घेण्यात येत आहे. त्यामुळं लोकलच्या वेगावर मर्यादा येणार असून काही लोकलही रदद् होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 30, 2024, 07:37 AM IST
पश्चिम रेल्वेवरील 150 ते 175 लोकल रद्द होणार; ट्रेनच्या वेगावरही मर्यादा येणार, नेमकं कारण काय?
Mumbai Local train News Today Train services to be affected 150 local will be cancelled

Mumbai Local News Today: पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून या कामासाठी सोमवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. सोमवारी रात्री 12.30 ते मंगळवारी पहाटे 4.30 वाजेपर्यंत गोरेगाव ते मलाड स्थानकादरम्यान अप आणि डाउन जलम मार्गावर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक काळात 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. तसंच, लोकलचा वेगदेखील  मंदावणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर सध्या पाचव्या व सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या मुळं गेल्या कित्येक दिवसांपासून मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात येत आहे. राम मंदिर, गोरेगाव आणि मालाड या स्थानकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी अप आणि डाउन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत 150 ते 175 लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता आहे. तसंच, 4 ऑक्टोबरपर्यंत पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अनियमित वेळापत्रकाला सामोरे जावे लागणार आहे. 

गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या प्रकल्पांचा अंतिम टप्पा सुरू होत आहे. 30 सप्टेंबरपासून राम मंदिर रोड, गोरेगाव आणि मालाड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन लोकल आणि अप व डाऊन या चारही मार्गावर ताशी 30 किमी वेगाचे निर्बंध लागू केले जातील. लोकलचा वेगाचा फटका दररोजच्या प्रवासावर पडू शकतो. तसंच, लोकलच्या फेऱ्याही रद्द केल्या जाणार आहेत. 

4 ऑक्टोबरनंतर लोकलची सेवा पूर्ववत होण्याची ग्वाही पश्चिम रेल्वेने दिली आहे. मात्र, त्याआधी गोरेगाव लूप मार्गिका उपलब्ध नसल्याने गोरेगावहून सकाळी धावणाऱ्या चारही जलद लोकल सेवा रद्द राहतील. तर, पुढील चार दिवस अनेक लोकल रद्द केल्या जाऊ शकतात. तसंच, या प्रकल्पासाठी एकूण 128.37 तास कार्यरत ब्लॉक्सची आवश्यकता आहे. त्यापैकी 43.30 तास शिल्लक आहेत. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव – कांदिवली स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून, या कामानिमित्त ही ब्लॉक मालिका सुरू आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x