मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.

Updated: Jun 2, 2018, 09:37 AM IST
मुंबई: रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक title=

मुंबई: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते ठाणे डाऊन धीम्या मार्गावर हा सकाळी ११.२० ते ४.२० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येईल. या कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. तर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.४० पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. या कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील. ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.

मध्य रेल्वे

माटुंगा ते ठाणे डाऊन धीम्या मार्गावर हा सकाळी ११.२० ते ४.२० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. या ब्लॉक दरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येईल. या कालावधीत विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर स्थानकांवर लोकल थांबणार नाहीत. 

हार्बर रेल्वे

हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे दरम्यान अप-डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते ४.४० पर्यंत ब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत प्रवाशांच्या सुविधेसाठी कुर्ला ते पनवेलपर्यंत विशेष लोकल चालवल्या जातील. ट्रान्सहार्बर आणि मध्य रेल्वेवरुन हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्यांना सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत प्रवासास मुभा आहे.