मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.

Updated: May 13, 2018, 08:24 AM IST
मुंबई: रेल्वेच्या तिनही मार्गावर मेगब्लॉक title=

मुंबई : रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवार, १३ एप्रिल) मेगाब्लॉक असणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे दुरुस्ती आणि देखभालीसाठी हा मेगाब्लॉक असेल.

मध्य रेल्वे

कल्याण ते ठाणे अप धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. या काळात कल्याणहून सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल कल्याण ते मुलुंडपर्यंत अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. मुलुंडहून पुढे या लोकल पुन्हा धीम्या मार्गावर चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेवर माहीम आणि अंधेरीपर्यंत ब्लॉक असेल. 

 हार्बर रेल्वे

 हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी, सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेलपर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत या मार्गावरील वाहतूक खंडीत ठेवण्यात येईल.