मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा (Covid19) प्रादुर्भाव वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. यानंतर, लोकांना लॉकडाउनची (Lockdown) भीती वाटू लागली आहे. अशा परिस्थितीत देशातील बर्याच शहरांतील राहणारे प्रवासी मजूर (Migrant Workers) मूळ गावी परत जाऊ लागले आहेत. रेल्वेमार्गावर (Railway Station) आणि बसस्थानकांवर (Bus Stops) मोठ्या संख्येने कामगार दिसत आहेत.
मुंबईतील कोरोना केसेसमध्ये (Mumbai Corona Cases) वाढ होतेय. संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध अधिक कठोर करण्यात आलेयत. गुरुवारी मुंबईतून उत्तर प्रदेशला जाणारी ट्रेन कामगारांनी भरलेली दिसून आली.
मुंबईत घातलेल्या निर्बंधानंतर कामगारांना लॉकडाऊनची भीती वाटू लागली आहे.अशा परिस्थितीत परप्रांतीय मजुरांना कोणत्याही परिस्थितीत आपल्या घरी परत जायचे आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकावर बरीच गर्दी दिसून येत आहे.
कोविड 19 ची केसेस मुंबईत सातत्याने वाढत असून लॉकडाऊन कधीही होऊ शकतो. म्हणून आम्ही शहर सोडत आहोत. कारण आम्हाला पुन्हा एकदा लॉकडाउनमध्ये अडकण्याची इच्छा नाही असे एका कामगाराने सांगितले.
कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसहून उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे जाणारी ट्रेन प्रवासी मजुरांनी भरली होती.
मुंबईप्रमाणेच दिल्लीतील स्थलांतरित मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गुरुवारी दिल्लीतील आनंद विहार रेल्वे स्थानकावर लोकांची प्रचंड गर्दी दिसून आली. परप्रांतीय कामगार आपल्या घरी परत जाण्यासाठी गोळा होऊ लागले आहेत.
बिहारमधील एका मजुराने वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, 'गेल्या वेळी लॉकडाऊन दरम्यान आम्ही इथे अडकलो होतो. अशा परिस्थिती याक्षणी घरी परत जाणे चांगले ठरेल.'