Baba Siddiqui Murder Case : मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींच्या जबाबात धक्कादायक खुलासे झाले आहेत. बाबा सिसिद्दी यांच्यावर हल्ला करण्यासाठी सुरुवातीला पुणे आणि ठाण्यातील शुटर्सना (Shooters) संपर्क करण्यात आला होता. पण या कामासाठी त्यांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरकडे एक कोटी रुपयांची मागणी केली होती. पण रक्कम जास्त असल्याने शुभम लोणकरने आपला प्लान बदलला. शुभमने हत्येची सुपारी उत्तर प्रदेशच्या शुटर्सना दिली. यासाठी त्यांना केवळ 50000 रुपये प्रत्येकी देण्यात आले होते.
झिशान सिद्दीकीही आरोपींच्या रडारवर
पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये बाबा सिद्दीकी यांच्याशिवाय त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकीचा (Zeeshan Siddique) फोटो सुद्ध होता. शुभम लोणकरच्या स्नॅपचॅट अकाऊंटवरुन झिशान सिद्दीकींचा फोटो आरोपींना शेअर करण्यात आला होता. बाबा आणि झिशान सिद्दीकी दोघंही आरोपींच्या टार्गेटर होते. यासाठी शुभम लोणकरने पुणे आणि ठाणे इथून शुटर्स हायर करण्याचं ठरवलं. पण सिद्दीकी पिता-पुत्रांना असलेली सुरक्षा पाहात आरोपींनी शुभम लोणकरकडे एक कोटींची मागणी केली.
दरम्यान पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या बॉडीगार्डला निष्काळजीपणा दाखवल्याप्रकरणी निलंबित केलं आहे.
उत्तरप्रदेशमधून शुटर्स बोलावले
नेत्याच्या हत्येनंतर त्याचे राज्यभरात पडसाद उमटणार याची शुभम लोणकरला कल्पना होती, पण शुटर्सना एक कोटी रुपये देण्यास लोणकर तयार नव्हता. यासाठी त्याने आपल्या प्लानमध्ये बदल केले. उत्तर प्रदेशमधल्या शुटर्सना बाबा सिद्दीकी यांची महाराष्ट्रातील इमेज आणि सुरक्षेबदद्ल माहित नसणार हे शुभम लोणकरला माहित होतं. त्यामुळे त्याने कमी पैशात हे शुटर्स काम करण्यासाठी तयार झाले. यानंतर धर्मराज आण शिवकुमार गुरनेल या शुटर्सना हायर करण्यात आलं. यानंतर त्यांना मुंबईत बोलावण्यातआलं आणि त्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला.
बाबा सिद्दीकींचा बॉडीगार्ड निलंबित
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येत शुभम लोणकर, शिवकुमार आणि झीशान मुख्य आरोपी आहेत. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने शुक्रवारी अम्बरनाथ आणि डोंबिवलीतून पाच आरोपींना अटक केली आहे. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या आता 9 झाली आहे. 12 ऑक्टोबरला बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला झाला त्यावेळी त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेले कॉन्स्टेबल श्याम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. पटाखांच्या आवाजामुळे धुर पसरला होता, त्यामुळे हल्लेखोरांना पाहात आलं नाही असा जबाब श्याम सोनावणे यांनी दिला आहे.
पोलीस विभागाने केलेल्या प्राथमिक तपासात श्याम सोनावणे यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.