'घर से निकलते ही' मुंबई पोलिसांचं ट्टिट, सोशल मीडियावर हीट

यामध्ये हेल्मेटशिवाय एक तरुण बाईकवर दिसतोय... आणि त्याच्यासमोर वाहतूक पोलीस उभे आहेत... 

Updated: May 16, 2018, 06:38 PM IST
'घर से निकलते ही' मुंबई पोलिसांचं ट्टिट, सोशल मीडियावर हीट   title=

मुंबई : ट्विटरवर अनेक गोष्टी वायरल होताना दिसतात. अनेक हॅशटॅगही ट्रेन्ड होतात... असंच एक ट्विट सध्या ट्रेन्डींगवर आहे... हे ट्विट केलंय मुंबई पोलिसांनी... १९९६ मध्ये आलेल्या 'पापा कहते है' या सिनेमातलं 'घर से निकलते ही' चांगलंच लोकप्रिय ठरलं होतं... याच गाण्याचा रिमेकही बनवण्यात आला होता.. गायक अमाल मलिक आणि अरमान मलिक यांनी हे गाणं गायलंय. मुंबई पोलिसांनी याच गाण्याचा आधार घेत आपलं कॅम्पेन सुरू केलंय... ट्विटरवर मुंबई पोलिसांचं 'घर से निकलते ही' नावाचा हॅशटॅग वायरल होतोय. 

घरातून बाहेर पडल्यानंतर तुमचा प्रवास जवळचा असेल वा दूरचा, पण हेल्मेट वापरा... अशा आशयाचा संदेश देत मुंबई पोलिसांनी दोन फोटोही शेअर केलेत... यामध्ये हेल्मेटशिवाय एक तरुण बाईकवर दिसतोय... आणि त्याच्यासमोर वाहतूक पोलीस उभे आहेत... 

मुंबई पोलिसांचा हा मजेशीर अंदाज सोशल मीडियावर हीट ठरलाय.... पोलिसांच्या या ट्विटवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रियाही नोंदवल्यात इतकंच नाही तर पोलिसांचं ट्विटर हॅन्डल करणाऱ्या व्यक्तीचं कौतुकही केलंय. अनेकांनी हे ट्विट रिट्विटही केलंय. 

उल्लेखनीय म्हणजे मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅन्डलची लोकप्रियता वेगानं वाढताना दिसतेय. गेल्या काही काळापासून या ट्विटर हॅन्डलच्या फोलोअर्सची संख्याही वाढलीय. या बाबतीत मुंबई पोलिसांनी बंगळुरू पोलिसांनाही मागे टाकलंय.