Mumbai Pub and Bar : पुण्यातील कोरोगाव पार्क भागात झालेल्या हिट अँड रन प्रकरणानंतर (Pune Porsche Accident) उत्पादन शुल्क विभाग, पोलिस आणि महापालिका यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील अनधिकृत पब, बार, रूफटॉप हॉटेल, लाऊंज, ऑर्केस्ट्रा, लेडीज बारची झाडाझडती सुरू केली आहे. दोन दिवसांत मुंबई पोलिस (Mumbai Police), महापालिका आणि उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने 131 ठिकाणी धाडी टाकून 43 बारवर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या विशेष मोहिमेत रात्री उशिरापर्यंत दारू विक्री करणाऱ्या 10 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बारवर कडक (Action On Pub) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर आल्याचं पहायला मिळतंय.
21 वर्षांखालील तरुणांना दारू विकल्याप्रकरणी दोन कारवाया करण्यात आल्या आहेत. तर टेरेस रूफटॉपमध्ये अवैध दारू पुरवठा केल्याप्रकरणी तीन कारवाया आणि उशिरापर्यंत महिला वेट्रेसद्वारे दारूसेवा पुरविणाऱ्या तीन ठिकाणांसह अन्य कारवाया करण्यात आले आहे. 23 कारवाया उत्पादन शुल्क विभागाने संयुक्तरीत्या मुंबई शहर, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या आहेत. विशेष तपासणी मोहिमेत एकूण 23 बारवर विविध स्वरूपाचे नियमभंग केल्याप्रकरणी कारवाया केल्या आहे.
दरम्यान, 21 वर्षाखालील व्यक्तींना मद्यविक्रीच्या 2 कारवाया करण्यात आल्या. तसेच विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री आणि परवाना कक्षाबाहेर मद्यविक्रीच्या 11 कारवाया झाल्या. ऑर्केस्ट्रा बारमध्ये उशिरा महिला नोकर काम करताना आढळल्याने 10 लेडीज बारवर कारवाई करण्यात आले आहे. त्यामुळे आता पुण्यापाठोपाठ मुंबईतही बार चालकांना धास्ती बसली आहे.
दरम्यान, अपघात प्रकरणानंतर आता पुण्यातील नाईट लाईफवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील अनधिकृत पब, बार आणि हॉटेल्सची यादीच धंगेकरांनी वाचून दाखवली. महाराष्ट्रातील तरुणाईच्या भवितव्याशी खेळू नका. तुम्ही तरुणाईला पोखरून काढत आहात. हा ड्रग्स कुठून सापडतो? असा सवाल धंगेकर यांनी केलाय. त्यामुळे आता पब चालक आता रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत.