मुंबई : मुंबईत सर जे जे कला महाविद्यालय उपयोजित , यांच्या आयोजनात "टायपो ग्राफी डे 2018" चे आयोजन 3 दिवसा करिता करण्यात आले होते , यंदाचे हे 11 वे वर्ष आहे यात पहिला दिवस कार्यशाळा आणि पुढील 2 दिवस अभ्यास परिषद आयोजित करन्यात आली होती.
पहिल्या दिवशी 14 कार्यशाळा झाल्या त्यात जगातील अनेक देशातील विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते ,30 विद्यार्थी साठी एक शिक्षक अशी गटवारी करीत ,14 विषयां पैकी 1 विषय घेऊन एक दिवस कार्यशाळेत सहभागी व्हावे लागले.
चर्चा सत्र हे विद्यार्थी केंद्रित होते तर, 90 शोध प्रबंध सादर केले त्यातील 20 प्रकल्प निवडण्यात आले या साठी 14 देशांनी सहभाग घेतला होता ,तर पोस्टर डिजाईन स्पर्धेत 55 देशातून पोस्टर डिजायनर सहभागी झाले आणि त्यांचे पोस्टर प्रदर्शनात मांडण्यात आले होते.