मुंबईत टोल फ्रीच्या निर्णयामुळे तुमचे वर्षाला किती रुपये वाचणार? रक्कमेचा आकडा ऐकून व्हाल हैराण

Mumbai Toll Tax:   टोल टॅक्स हटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक वर्षाकाठी एक मोठी रक्कम जमा करु शकतात. 

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 15, 2024, 04:40 PM IST
मुंबईत टोल फ्रीच्या निर्णयामुळे तुमचे वर्षाला किती रुपये वाचणार? रक्कमेचा आकडा ऐकून व्हाल हैराण
मुंबई टोल फ्री

Mumbai Toll Tax: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे सरकारने महत्वाचा निर्णय घेत टोल माफी जाहीर केली. यामुळे मुंबईत येणाऱ्या-जाणाऱ्या वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवरील सर्व पाचही टोल प्लाझांवरील हलक्या वाहनांना टोल टॅक्सपासून हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रोजच्या साधारण 2.8 लाख वाहन चालकांना फायदा होणार आहे. टोल टॅक्स हटल्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक वर्षाकाठी एक मोठी रक्कम जमा करु शकतात. 

Add Zee News as a Preferred Source

आजपासून या गाड्यांसाठी टोल फ्री 

महाराष्ट्र निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवरील टोल फ्री केलाय. पाचही टोल बूथवरुन मुंबईत येणाऱ्या किंवा मुंबईतून जाणाऱ्या हलक्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. कामाच्या निमित्ताने मुंबईत येणाऱ्या वाहन चालकांना याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास निगम म्हणजेच एमएसआरडीसीने यासंदर्भात महत्वाची अपडेट दिली आहे. एलबीएस रोड, मुलूंडमधील इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ऐरोली क्रीक ब्रीज, दहिसरमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि वाशीतील क्रीक ब्रिगेड या पाचही स्थानकावरुन येणाऱ्या छोट्या वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही. या निर्णयामुळे साधारण 2.8 लाख हलक्या वाहनांना मोटार वाहनांना याचा फायदा मिळणार आहे. 

टोल टॅक्स हटल्यानंतर तुमची किती होईल सेव्हिंग?

सरकारने दहीसर, मुलूंड,ठाणे, ऐकोली आणि वाशी टोल प्लाझावरील छोट्या वाहनांवरील टोल माफ करण्यात आलाय. अवजड वाहनांकडून पुर्वीप्रमाणे टोल घेतला जाणार आहे. या टोलवर छोट्या वाहनांकडून 45 रुपयांपासून 75 रुपयांपर्यंत टोल घेतला जातो. तुमच्यापैकी कोणी या टोलनाक्यावरुन जात असेल तर तुम्हाला किमान 45 रुपये टोल टॅक्स द्यावा लागू शकतो. तुम्ही आठवड्यातील किमान पाच दिवस या टोल नाक्यावरुन प्रवास करत असाल तर 45 रुपयांप्रमाणे पाच दिवसांचे 225 रुपये खर्च होतात. म्हणजेच वर्षभर तुम्ही टोलसाठी 11 हजार 700 रुपये खर्च करता. 

एका वर्षाचे 19 हजार 500 रुपये वाचणार

तुमच्याकडे एसयूव्ही कार असेल तर टोल प्लाझावर 75 रुपये टोल टॅक्स द्यावा लागतो.म्हणजेच आठवड्याच्या पाच दिवस ऑफिसला जात असाल तर साधारण 375 रुपये खर्च करता. म्हणजेच वर्षाचे 19 हजार 500 रुपये टोलसाठी खर्च करता. टोल टॅक्स हटल्यामुळे तुमची ही रक्कम वाचू शकते. ज्याची तुम्ही सेव्हिंग करु शकता.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More