विद्यापीठ कॅम्पसमध्ये युवतीचा विनयभंग, सीसीटीव्हीवर प्रश्नचिन्ह

 मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये रानडे भवनात दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग झालाय.

Updated: Aug 9, 2018, 10:54 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये रानडे भवनात दिवसाढवळ्या एका विद्यार्थिनीचा विनयभंग झालाय. या भागात सुरक्षा व्यवस्था अजिबात नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही नसल्याची माहिती पुढे आली आहे. कलिना कॅम्पसमध्ये अजूनपर्यंत एकही सीसीटीव्ही लावण्यात आलेला नाही. त्यावरून भयानकता उघड होईल. मुलीने विभागप्रमुखांकडे तक्रार केलीय. मुलगी प्रचंड तणावाखाली आहे.

सीसीटीव्ही नाही ?

कलिना कॅम्पसमधील जवळपास ६० इमारतींसाठी २९९ सीसीटीव्हीची गरज असल्याचा प्रस्ताव २०१२ साली सादर करण्यात आला होता. तात्कालीन कुलगुरुंनी त्याला मंजुरी दिली होती. मात्र त्यानंतर आजतागायत कलिना कॅम्पस येथे सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत.