मुंबई विद्यापीठाची पेपर तपासण्यासाठी अजब शक्कल

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं नुकसान होऊ लागलं आहे. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली आहे. आणि सुटीचं कारण ऐकून तुम्ही कपाळावर हात मारला नाही तरच नवल. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे.

Updated: Jul 24, 2017, 09:46 AM IST
मुंबई विद्यापीठाची पेपर तपासण्यासाठी अजब शक्कल title=

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारानं आता विद्यार्थ्यांचा अभ्यासाचं नुकसान होऊ लागलं आहे. विद्यापीठानं आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आजपासून सलग चार दिवस सुटी दिली आहे. आणि सुटीचं कारण ऐकून तुम्ही कपाळावर हात मारला नाही तरच नवल. प्राध्यापकांना पेपर तपासण्यासाठी वेळ मिळावा म्हणून विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकांच्या ऑनलाईन तपासणीतल्या घोळामुळे आता चार दिवस मुंबई विद्यापीठाच्या सर्वच कॉलेजमध्ये ही अध्ययन सुटी देण्यात आली आहे.

३१ जुलैपुर्वी गेल्यावर्षीचे निकाल जाहीर करा असा आदेश राज्यपालांनी काढला आहे. विद्यापीठात दरवर्षी १८ लाख उत्तरपत्रिका तपासल्या जातात. आता 31 जुलैच्या आत जर निकाल लावायचे असतील,तर दिवसाला 60 हजार उत्तरपत्रिका तपासून पूर्ण करव्या लागणार आहेत. त्यामुळे आता प्राध्यपकांना त्यांचं शिकवण्याचं काम सोडून तपासणीच्या कामाला जुंपण्यात आलं आहे.  दरम्यान आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विद्यापीठातल्या अनागोंदीविषयी पुन्हा एकदा राज्यपाल विद्यासागर राव यांची भेट घेणार आहेत.