बिग बॉस विनर आणि कॉमेडियन म्हणून लोकप्रिय असलेला मुनव्वर फारुकी सध्या आपल्या एका वक्तव्यामुळे अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. एका स्टँडअप कॉमेडी शोमध्ये कोकणी माणसाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. एका कार्यक्रमात मुन्नवरने कोकणी लोकांबाबत अपशब्द वापरल्यामुळे त्याच्यावर टीका सुरू झाली आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
जर ह्याने कोकणी माणसांची माफी नाही मागितली तर हा पाकिस्थान प्रेमी मुनावर जिथे दिसेल तिथे त्याला तुडवणार कोकणी माणूस कसा तुडवतो हे याला समजून दे याला जो तुडवेल त्याला एक लाखाचे बक्षीस येवो कोकण आपलंच असा
असे म्हणून स्वागत करणाऱ्या कोकणी माणसांबद्दल हे उपरे ही भाषा… pic.twitter.com/9u9XjDteL2— Samadhan Sarvankar (@samadhan234) August 12, 2024
शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर (Sada Sarvankar) यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी मुनव्वर फारुकीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. तसेच मुनव्वरला तुडवण्यासाठी एक लाखाचं बक्षिस देणार असल्याचं म्हटलं आहे.
@MumbaiPolice सदर व्यक्ती विशिष्ट भाषिक समुदायाबद्दल उघडपणे असभ्य भाषेत टिपणी करत आहे. कृपया समज द्यावी https://t.co/hsHqGfYFon
— प्रियांका Deshpande (പ്രിയങ്ക) (@priyankadroh) August 12, 2024
तुम्ही सगळेजण बॉम्बे म्हणजे मुंबईतून आलात की? कुणी प्रवास करुन आलंय, असा प्रश्न मुन्नवरने कार्यक्रमात विचारलं. तेव्हा एका व्यक्तीने आम्ही तळोज्याहून आल्याचं सांगितलं. तेव्हा मुन्नवर म्हणाला की, आता विचारलं तर सांगत आहेत. तळोजे मुंबई बाहेर झालं. यांचे गाववाले विचारत असतील तर सांगत असतील, मुंबईत राहतो. हे कोकणी लोक चु** बनवतात सगळ्यांना.
मुन्नवर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या लोकांना तळोजे वरुन आलेल्या व्यक्तीला तू कोकणी आहेस का? असा देखील सवाल केला. आणि तो देखील हो म्हणाला. यावर मुन्नवर फक्त हसला...
@avinash_mns
ह्याला चोप द्यावं लागणार दादा https://t.co/dkb7Bo7BWA— राज सरकार(मनसे परिवार) (@BhanseVirendra) August 12, 2024
फारुकीने यापूर्वी अशाच स्टॅन्ड अप कॉमेडी शोमध्ये हिंदू देवतांचा अपमान केला होता. 2021 मध्ये त्याला याप्रकरणी अटकही झाली होती. हिंदू देवतांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे त्याच्याविरोधात अनेक राज्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या प्रकरणावरुन मुन्नवर फाकुरीवर मनसे आक्रमक होणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
मुनव्वर फारुकी एक स्टार कॉमेडियन आहे. ज्याने 2021 मध्ये मध्य प्रदेशच्या पोलिसांनी हिंदू देवी देवतांचे अपमान करणारे वक्तव्य केले होते. ज्याबद्दल त्याला अटक देखील करण्यात आलं होतं. 2020 मध्ये मुनव्वर फारुकीवर हल्ला झाला होता. तसेच युट्यूबवर एक व्हिडीओ अपलोड केला होता ज्यामुळे त्याच्यावर खटला भरला होता. मुनव्वर 31 वर्षांचं एक कॉमेडियन असून तो अनेकदा वादग्रस्त विधानांमध्ये कायमच चर्चेत राहिला आहे. रिऍलिटी टीव्ही शो बिग बॉसमध्ये देखील चर्चेत राहिला.