गणपती बाप्पाने मला खूपकाही दिले - नारायण राणे

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. 

Updated: Aug 25, 2017, 11:07 PM IST
गणपती बाप्पाने मला खूपकाही दिले - नारायण राणे  title=

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधल्या निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय. नारायण राणेंनी कुटुंबीयांसह गणपतीची पूजा केली. महाराष्ट्राच्या अपेक्षा पूर्ण करण्याची बुद्धी देवो असं सूचक विधान करत राणेंनी गणरायाला साकडं घातलं. 

तसंच राज्याला दुष्काळ आणि नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवण्याची प्रार्थनाही राणेंनी गणरायाला केली. गणरायाकडे काही मागत नाही, कारण गणरायानं आपल्याला खूपकाही दिल्याचं समाधानही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.