नारायण राणे राजकीय वाटचालीची दिशा आज स्पष्ट करणार

शिवसेना मार्गे कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी तर दिली. पण, आता पुढे काय? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज (रविवार १, ऑक्टोब) मिळण्याची शक्यता आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 1, 2017, 09:36 AM IST
नारायण राणे राजकीय वाटचालीची दिशा आज स्पष्ट करणार  title=

मुंबई : शिवसेना मार्गे कॉंग्रेस असा राजकीय प्रवास करणारे नारायण राणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी तर दिली. पण, आता पुढे काय? या संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आज (रविवार १, ऑक्टोब) मिळण्याची शक्यता आहे.

आपल्या पुढील राजकीय वाटचालीबाबातची दिशा नारायण राणे आज स्पष्ट करतील अशी सूत्रांची माहिती आहे. शिवसेनेतून राणेंच्या रूपाने बाहेर पडलेला बाण कॉंग्रेसच्या भात्यात गेला खरा. मात्र, 'थंडा करके खाओ' पद्धत वापरणाऱ्या कॉंग्रेससारख्या पक्षात राणेंसारखा बाण ऋजने तसे कठीणच होते. दरम्यान, झालेही तसेच, कॉंग्रेस आणि राणे यांच्यातील अंतर वाढत गेले. अखेर राणेंनी कॉंग्रेस सोडली.

कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर राणे भाजपसोबत सलगी करू पाहात होते. त्यासाठी त्यांनी हॉस्पिटल उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे कारण पुढे करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांचीही भेट घेतली. पण, या भेटीनंतर भाजप आणि राणे यांच्या राजकीय हालचाली पाहता त्यांच्या भाजप प्रवेशाचा विषय सध्या तरी अनिर्णीत राहल्याचे दिसते.

दरम्यान, कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या राणेंचा जर भाजप प्रवेश झाला नाही तर, राणेंसमोर राष्ट्रवादीचा पर्याय आहे. पण, हा पर्यांय तितका मजबूत नाही. त्यामुळे राणेंसमोर स्वत:चा पक्ष काढत आपले उपद्रवमुल्य कायम ठेवणे हा एकमेव पर्याय असू शकतो, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे. मात्र, हा पर्याय वापरताना राणे आपले पुत्र नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचेच पक्षात रूपांतर करणार की, ही संघटना कायम ठेऊन नव्या नावाने राजकीय पक्ष काढणार याबाबत उत्सुकता आहे. आज ही उत्सुकता संपुष्टात येण्याची शक्यता आहे.