मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार

26/11 हल्ल्याच्या खुणा अंगावर मिरवणारं मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौ-यावर आहेत. ते गुरुवारी मुंबईत येणार आहेत. 

Updated: Jan 15, 2018, 11:13 AM IST
मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार title=

मुंबई : 26/11 हल्ल्याच्या खुणा अंगावर मिरवणारं मुंबईचं नरीमन हाऊस आता स्मारक होणार आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू सध्या भारत दौ-यावर आहेत. ते गुरुवारी मुंबईत येणार आहेत. 

ज्यू लोकांचं संस्कृती केंद्र

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू मुंबई दौ-याच्या वेळी नरीमन हाऊसमधल्या या स्मारकाचं उदघाटन करण्यात येईल. कुलाब्यात असलेल्या पाच मजली इमारतीत ज्यू लोकांचं वास्तव्य आणि संस्कृती केंद्रही होतं. पण 26 नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यात हे केंद्र चालवणा-या राबी गावरीएल आणि रिवका होल्ट्झबर्गसस सहा लोकांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा मोशे त्यावेळी दोन वर्षांचा होता. त्याला वाचवण्यात भारतीय नौदलाला यश आलं होतं.

मोशे पहिल्यांदाच येणार

आता नऊ वर्षांचा झालेला मोशे या स्मारकाच्या उदघाटनावेळी उपस्थित राहणार आहे. 26/11 च्या हल्ल्यानंतर मोशे पहिल्यांदाच छाबड हाऊसमध्ये येणार आहे.