Crime Video : निर्दयीपणाचा कळस! वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

Crime News : एका धक्कादायक व्हिडीओने नागरिकांची झोप उडवली आहे. एका वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करतानाचा हा व्हिडीओ पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Updated: Mar 28, 2023, 11:59 AM IST
Crime Video : निर्दयीपणाचा कळस! वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकाला मारहाण
Navi Mumbai Crime News man beaten up 86 year old senior citizen airoli vrudhashram Video viral on Social media trending now

Navi Mumbai Crime News Video  : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करताना दिसतं आहे. हे कृत्य पाहून  निर्दयीपणाचा कळसच आहे असंच म्हणायला हवं. ज्येष्ठ नागरिकांना केअर सेंटरमध्ये त्यांचा देखभालसाठी ठेवण्यात येतं. त्यांचा सोबत अशी वागणून पाहून नेटकरी संतापले आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

धक्कादायक व्हिडीओ 

केअर सेंटर  या वृद्धाश्रमात एका 86 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करण्यात आलीय. वृद्धाश्रमात काम करणाऱ्या केअर टेकरनं ही मारहाण केलंय. मारहाणीची घटना एका व्यक्तीनं आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात चित्रित केलीय. 

कुठे घडली ही घटना?

हा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील ऐरोली (Airoli) साई केअर सेंटर या वृद्धाश्रमात घडली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर  काही समाजसेवकांच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात केयर टेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (Navi Mumbai Crime News man beaten up 86 year old senior citizen airoli vrudhashram Video  viral on Social media trending now)

लहान मुलं आणि वृद्ध लोक वयाने सारखीच असतात. वृद्ध नागरिक एका लहान मुलासारखे हट्ट करत असतात. अनेक वेळा ते आपलं बोलणं ऐकत नाहीत. एखाद्या गोष्टीसाठी अडून बसतात. अशावेळी त्यांना हाताळणे कठीण होतं. म्हणून त्यांना अशाप्रकारे मारहाण करणे ही चुकीची आणि अयोग्य गोष्ट आहे. वृद्ध नागरिकांना सांभाळं हे कठीण काम असलं तरी त्यांना प्रेमाने हाताळावे लागते. चिडचिड आणि त्रागा करुन काम होतं नाहीत. 

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर @Ruchika66964659 यावर शेअर करण्यात आला आहे.