तुम्हाला मोबाईल रिचार्जला ५०० रु महिना मिळाला तर....या विद्यार्थ्यांना मात्र मिळणार

मोबाईल रिचार्जसाठी विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे,

Updated: Jun 3, 2021, 07:00 PM IST
तुम्हाला मोबाईल रिचार्जला ५०० रु महिना मिळाला तर....या विद्यार्थ्यांना मात्र मिळणार title=

नवीमुंबई : कोरोनामुळे देशात गेल्या वर्षीपासून लॉकडाऊन लावला गेला आणि लोकांच्या गर्दी करण्यावरीत निर्बंध लावले गेले. ज्यामुळे शाळा आणि कॉलेजेस देखील बंद ठेवण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शासकीय आणि खासगी शाळांमध्ये ऑनलाईन शिकवणीचा पर्याय निवडला. परंतु त्यानंतर शासकीय किंवा पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसामोर एक मोठी समस्या उभी राहिली कारण, जिथे या विद्यार्थींना एका वेळेच्या जेवणाचे वांदे आहेत असे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल रिचार्जचा खर्च कसा काय उचलू शकणार?

मोबाईल रिचार्जसाठी विद्यार्थ्यांकडे पैसे नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे नवी मुंबई पालिकेने अशा मुलांना मोबाईल रिचार्जसाठी महिना पाचशे रुपये देण्याची योजना तयार केली आहे. या शिवाय या करोना काळातही विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावे यासाठी पालिका तज्ज्ञांचा सल्ला विचारात घेतला जात आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पालिका शाळेत विद्यार्थ्यांची कमी आहे, परंतु त्यांच्या तुलनेत नवी मुंबईतील पालिकेच्या शाळांची पटसंख्या दरवर्षी वाढत आहे.

या विद्यार्थी संख्येच्या बळावरच पालिकेने दोन सीबीएसई माध्यमाच्या शाळा सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुबंईत ७२ शाळांमध्ये ४२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

गेल्या वर्षीपासून ह्य़ा शाळा कोरोनामुळे बंद आहेत. राज्यातील खासजी शालेय तसेच महाविद्यालयीन शाळेचा खेळखंडोबा सुरु असताना, पालिका विद्यार्थ्यांना या काळातही उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळेच पालिका शाळेतील दहावीच्या विद्यार्थाना चांगले यश मिळत असल्याचे दिसून आले आहे.

नवी मुंबई पालिकेच्या शाळेत जाणारे विद्यार्थी हे झोपडपट्टी भाग आणि ग्रामीण भागातील बेकायदेशीर बांधकामात राहणारे आहेत. पालिका शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अगदी कमी असे विद्यार्थी आहेत ज्यांच्याकडे मोबाईल आहे. ज्य़ाच्यासाठी त्यांना आपल्या पालकांकडे असलेल्या मोबाईलवरती अवलंबून रहावे लागले आहे.

करोनाकाळात अनेकांचे काम गेले आहेत. त्यामुळे काही लोकांना हा मोबाईल रिचार्ज करणेही शक्य नाही. या सगळ्या गोष्टींना विचारात घेता पालिकेच्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी महिन्याकाटी 500 रुपयांचा रिचार्ज देण्याचा पालिकेचा शिक्षण विभाग प्रस्ताव तयार करीत आहे.

पालिका शाळेत जाणाऱ्या प्रत्येक पाल्याच्या पालकांकडे स्वस्तातील परंतु स्मार्ट मोबाईल असल्याचे दिसून आले आहे. त्याचा रिचार्ज केल्यावर विद्यार्थ्यांचे वर्ग घेणे शक्य होणार आहे. पालिकेच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात यावेत असा एक प्रस्ताव मध्यंतरी मांडण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पालिकेत अशा टॅबचे नंतर काय झाले हे जगजाहिर आहे. त्यामुळे नवी पालिकेच्या ४२ हजार विद्यार्थ्यांसाठी पुढील करोना काळात शैक्षणिक डिजेटल सुविद्या उभ्या करण्याचा पालिका प्रयत्न आहे.

सीएसआर निधीचा पर्याय

पालिकेच्या विद्यार्थ्यांना टॅब न देण्याच्या निर्णयावर प्रशासन ठाम आहे. करोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणकि नुकसा होऊ नये यासाठी पालिका विविध तज्ञांनी चर्चा करत आहे. त्यात हा मोबाईल रिचार्ज योजनेवर विचार सुरु आहे. मोबाईल रिचार्ज करण्यासाठी पालिकेचे दोन कोटी रुपये खर्च करण्याची तयारी आहे.

यानंतर ही सुविधा राज्यातील सगळ्याच पालिका शाळेमध्ये लावली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.