नवी मुंबई : नवी मुंबईमधील प्लॅब परीक्षा सेंटर उडवून देण्याची धमकी तालिबान या दहशतवादी संघटनेकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्लॅब केंद्रांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.
प्लॅब परीक्षा दिल्यानंतर UK येथे वैद्यकीय शिक्षणासाठी जाता येते. नवी मुंबईतील प्लॅब केंद्रांची पोलिसांनी तपासणी केली आहे. मात्र या तपासणीत त्यांना काहीही आढळून आले नाही. तालिबान या दहशतवादी संघटनेच्या नावाने खोटा कॉल करण्यात आला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस सतर्कता ठेवत आहेत. वाशी सेक्टर 17 मधील शिव सेंटरमद्ये हे केंद्र आहे.
राज्यात अनेक वेळा अशाप्रकारचे खोटे कॉल पोलिसांना प्राप्त झाले आहेत. मुंबईतील हॉटेल ताजमध्ये 2 बंदुकधारी घुसल्याचा कॉल असो किंवा मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री उडवून टाकण्याची धमकी पोलिसांनी या कॉल्सचा लगेचच छडा लावला आहे. या कॉलचाही तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.