Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला

Anil Deshmukh's rejected bail application : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळीही जेलमध्ये जाणार आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावर पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

Updated: Oct 21, 2022, 03:29 PM IST
 Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला title=

मुंबई : former home minister Anil Deshmukh's Diwali in jail : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे देशमुख यांची दिवाळीही जेलमध्ये जाणार आहे. (NCP leader and former home minister Anil  Deshmukh's court rejected the bail application ) दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचाही कोठडीतील मुक्काम वाढला आहे. त्यांच्या जामिनावर पुढील सुनावणी 2 नोव्हेंबरला होणार आहे.

अनिल देशमुख यांच्यातर्फे दाखल करण्यात आलेला जामिनासाठीची याचिका फेटाळण्यात आलेय.  देशमुख यांनी सीबीआयच्या प्रकरणात जामिनासाठी केलेल्या अर्जावरील निकाल सत्र न्यायालयाने शुक्रवारी दुपारी सुनावला. काल गुरुवारी दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला होता. ईडीप्रमाणे सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मिळून अनिल देशमुख दिवाळीपूर्वी तुरुंगाबाहेर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र जामीन नाकारल्याने ते आता जेलमध्ये राहणार आहेत. कथित आर्थिक अफरातफर प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने अ‍ॅड. अनिकेत निकम यांनी सीबीआयच्या प्रकरणात जामीन अर्ज दाखल केला होता. 73 वर्षीय देशमुख सध्या अतिताण, हृदयविकार यांसारख्या विविध गंभीर आजारांनी त्रस्त आहेत.

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि माजी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या नोंदवलेल्या जबाबानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्या दोघांचे जबाब विश्वासार्ह नसल्याचे निरीक्षण उच्च न्यायालयाने ईडीच्या प्रकरणात जामीन देताना नोंदवले आहे. याकडे देशमुख यांच्या वकिलांनी विशेष सीबीआय न्यायालयाचे लक्ष वेधले होते. मात्र, त्यांचा पुन्हा एकदा जामीन अर्ज फेटाळला गेलाय.

संजय राऊत यांना दिलासा नाहीच

दरम्यान, दुसरीकडे आज संजय राऊत यांचानाही न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिलाय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत कोठडीत आहेत. आज कोर्टात पोलिसांनी राऊतांविरोधात तक्रार केली. सुनावणीला नेत असताना राऊत मीडिया आणि कार्यकर्त्यांना भेटत असल्याची तक्रार पोलिसांनी न्यायाधीशांकडे केली. पण, या तक्रारीवरुन न्यायाधीशांनी पोलिसांना फटकारले आहे. लेखी तक्रार करा, जर राऊत यांना लोक भेटतात तर तुमच्या पोटात का दुखते? ते राजकीय विधान करतात. मात्र ईडीला काही अडचण नाही आणि बाहेरच्या सुरक्षेवर नियंत्रण ठेवणे हे माझ्या अखत्यारीत नाही, असं न्यायाधीशांनी पोलिसांना खडसावले आहे.