पती गेला पत्नीच्या कामावर, 3 वेळा तलाक बोलून संपवलं नातं; कारण ऐकून येईल संताप

New Mumbai crime:  अलताफचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबध होते. याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला समजली होती.

Updated: Mar 3, 2024, 09:48 AM IST
पती गेला पत्नीच्या कामावर, 3 वेळा तलाक बोलून संपवलं नातं; कारण ऐकून येईल संताप title=
tripple Talaq Case

New Mumbai crime:  एका नवऱ्याने स्वत:चे विवाहबाह्य संबध सुरु ठेवण्यासाठी पत्नीला तलाक दिल्याची घटना घडली आहे. हा व्यक्ती तळोजा भागात राहतो. तो काझी आणि दोन इस्लामी वकिलांसोबत त्याची पत्नी कामाला असलेल्या खारघरमधील कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेला. अलताफ मुबारक अत्तार असे या पतीचे नाव आहे. पुढे जे घडले ते पत्नीसाठी धक्कादायक होते. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

अलताफ मुबारक अत्तार पत्नीच्या कामावर गेला आणि तिच्या समोर जाऊन 3 वेळा तलाक म्हणाला. मी तुला घटस्फोट दिल्याचे त्याने पत्नीला सांगितले. यानंत पत्नीने खारघर पोलिसांत तक्रार दिली. महिलेच्या तक्रारीवरुन अलताफ अत्तारविरोधात मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकाराचे संरक्षण) कायद्या 2019 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

अलताफची पत्नी खारघरमधील एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये क्लर्क म्हणून कामाला आहे. तर अलताफ चालक म्हणून काम करतो. अलताफचे दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबध होते. याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला समजली होती. पत्नीने त्याबाबत अलताफकडे विचारणा केली होती. त्यामुळे अलताफने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. 

छळाला कंटाळून पतीविरोधात तक्रार

अलताफ पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शारीरीक आणि मानसिक त्रास देऊ लागला होता. पतीकडुन होत असलेल्या या छळाला कंटाळून अलताफच्या पत्नीने त्याच्याविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.  त्यानंतर या दोघांची पोलिसांच्या महिला सहायता कक्षाकडुन समुपदेशन सुरु होते. याचदरम्यान गत 20 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अलताफची पत्नी आपल्या कॉलेजमधील कॅन्टीनध्ये इतर मैत्रिणीसह चहा पिण्यासाठी गेली होती. त्यावेळी अलताफ हा आपल्यासोबत एक काझी, दोन इस्लामी वकिल आणि सोबत साक्षीदार घेऊन कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये गेला. 

धर्मगुरुंकडून मार्गदर्शन

यानंतर आपल्या पत्नीला तीनवेळा तलाक बोलुन सर्वांसमोर तलाक देऊन त्याठिकाणावरुन निघून गेला. अलताफच्या पत्नीने धर्मगुरुंकडून या घटनेच्या संदर्भात कायदेशीर मार्गदर्शन घेतले. यानंतर खारघर पोलीस ठाण्यात पती विरोधात तक्रार दाखल केली आहे.