राज्यपालांनी 6 आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं 'ते' पत्र बनावट

Big reveal - Governor Bhagat Singh Koshyari is fake letter :  6 आमदारांबाबत पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्राबाबत राजभवनाकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे. 

Updated: Apr 19, 2022, 02:19 PM IST
राज्यपालांनी 6 आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं 'ते' पत्र बनावट   title=

मुंबई : Big reveal - Governor Bhagat Singh Koshyari is fake letter : राज्यपालांनी 6 आमदारांची नावं सुचवलेलं पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे पत्र बनावट असल्याचा राजभवनकडून खुलासा करण्यात आला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आमदारांच्या नावांची शिफारस केल्याचं पत्र बनावट असल्याचं समोर आले आहे. राजभवनानं 'झी 24 तास'ला याबाबत माहिती दिलीय. 12 आमदारांच्या नियुक्त्यांबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या 6 नावांची शिफारस केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र सप्टेंबर 2020 सालचे असल्याचं या पत्रात लिहिण्यात आले आहे.

राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी 12 नावांची यादी दिली होती. मात्र, अद्याप या नावांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजुरी दिलेली नाही. दरम्यान, आज एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. या पत्राबाबत राजभवनाकडून खुलासा करण्यात आला आहे. 'ते' पत्र बनावट आहे. राज्यपालांकडून 12 पैकी 6 आमदारांची नावे दिल्याचे या पत्रात म्हटले होते. परंतु तसे काहीही नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यपाल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले यात पत्रात काही नावे सूचविण्यात आली आहेत. यामध्ये वीरभद्रेश करबसप्पा बसवंती (सामाजिक), रमेश बाबूराव कोकाटे (राजकीय), सतीश रामचंद्र घरत (उद्योग), संतोष अशोक नाथ ( सामाजिक), मोरेश्वर महादू भोंडवे (राजकीय), जगन्नाथ शिवाजी पाटील (सामाजिक) यांचा समावेश आहे.

या सहा जणांची शिफारस केली आहे, असे सोशल मीडियावर व्हायरल होत होते. मात्र, हे पत्र बनावट असल्याचे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या पत्राबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हे पत्र कोणी सोशल मीडियावर फिरवले. या पत्रामागे कोणाचा हात आहे, आदी सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. 

सोशल मीडियावर फिरणारे बनावट पत्र