नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 7, 2017, 10:19 PM IST
नोटाबंदीनंतर ५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा title=

मुंबई : राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाकडील अधिकृत माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदीची घोषणा केली, यानंतर अवघ्या ५३ दिवसात, २ हजार रूपयांच्या बनावट नोटा बाजारात दाखल झाल्या. 

नवी नोट ८ नोव्हेंबर नंतरच चलनात दाखल

एनसीआरबीने  ३० नोव्हेंबर रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे, त्यानुसार , २ हजार रुपयांच्या २ हजार २७२ बनावट नोटा गेल्या वर्षी  जप्त करण्यात आल्या होत्या. तसेच २ हजार रुपयांची आणि ५०० रुपयांची नवी नोट ८ नोव्हेंबर नंतरच चलनात दाखल झाली होती.

५३ दिवसांत २ हजारांच्या बनावट नोटा चलनात

यानंतर ८ नोव्हेंबरनंतर ३१ डिसेंबर या काळात, म्हणजेच ५३ दिवसांतच पोलिस आणि इतर सरकारी संस्थांना या बनावट आढळून आल्या. याच काळात संपूर्ण देशातील लोक नव्या २ हजार रुपयांच्या नोटेच्या प्रतिक्षेत होते.

पाहा कोणत्या राज्यात किती बनावट नोटा आढळल्या

गुजरातमध्ये १३०० ( २ हजार रुपयांच्या सर्वाधिक बनावट नोटा गुजरातमध्ये)
पंजाब ५४८ 
कर्नाटक २५४ 
तेलंगणा ११४ 
महाराष्ट्र २७ 
मध्य प्रदेश ८
राजस्थान ६
आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरयाणा ३
तर जम्मू-काश्मीर आणि केरळमध्ये प्रत्येकी २ बनावट नोटा 
मणिपूर आणि ओडिशामध्ये २ हजार रुपयांची प्रत्येकी १ नोट आढळली

विशेष म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी, टेरर फंडिंग रोखण्यासाठी तसेच बनावट चलनाचे रॅकेट उध्वस्त करण्यासाठी हा नोटाबंदीचा निर्णय घेतल्याचे, पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं होतं. मात्र, तब्बल २ लाख ८१ हजार ८३९ इतक्या विविध किंमतीच्या बनावट चलनी नोटा देशातील विविध भागातून आढळून आल्या होत्या.