मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शपथविधी निमंत्रणाच्या घोळाचं खापर राजशिष्टाचार विभागावर फोडलं आहे. छोट्या पक्षांसह सर्वांना निमंत्रण देण्याचा प्रयत्न होता. शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणाची जबाबदारी राजशिष्टाचार विभागाची होती. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यानं घोळ घातला याची चौकशी केली जाणार असल्याचंही अजित पवारांनी सांगितलं.
तसंच यापुढे असा प्रकार होणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येईल असंही त्यांनी नमूद केलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्रिपदावरून नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्यात आली आहे, त्यांचं योग्य पद्धतीनं समाधान करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीय.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या घटकपक्षांनी तसेच काही दिग्गजांनी आपल्याला शपथविधीचं आमंत्रण न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली होती.