उद्या ओला-उबेर चालकांचा संप!

ओला उबेरची सेवा सुरू झाली आहे किंवा नाही ही तपासून पाहणे योग्य असेल.

Surendra Gangan Updated: Mar 17, 2018, 11:04 PM IST
उद्या ओला-उबेर चालकांचा संप! title=

मुंबई : टॅक्सीनंतर लोकप्रिय असलेली ओला, उबेर सेवा तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी घेण्यास अडचणी येणार आहेत. मुंबईत या सेवेवर किती परिणाम होईल याचा अंदाज बांधणे कठीण असले, तरी देखील ओला उबेरची सेवा सुरू झाली आहे किंवा नाही ही तपासून पाहणे योग्य असेल.

गुढीपाडव्याला अडचण होण्याची दाट शक्यता

दिल्ली, मुंबईसह काही शहरातील लोकांना गुढीपाडव्याला अडचण होण्याची दाट शक्यता आहे. ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिव्हाईस बंद करून विरोध प्रदर्शन करणार आहेत. 

ओला आणि उबेरची सेवा ग्राहकांना मिळणे कठीण

गुढीपाडव्याच्या दिवशी ओला आणि उबेरची सेवा ग्राहकांना मिळणार नाही, असं म्हटलं जात आहे. ओला-उबेरचे चालक सकाळी आठ पासून आपले डिव्हाईस बंद करुन आपला विरोध व्यक्त करणार आहेत.

चालकांना लोनचा हप्ता देखील भरणे कठीण

कर्ज काढून गाडी घेऊन काम करणाऱ्या चालकांना लोनचा हप्ता देखील भरणे कठीण झाले असल्यामुळे, त्यांच्या गाड्या बँकेकडून जप्त होत आहेत.

चालक कमी रेटिंगच्या ड्राईव्हरची पुन्हा नियुक्ती करावी आणि वाहनानुसार भाडे निश्चित करावे, अशा विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन करणार आहेत. फक्त मुंबईमध्ये ४५ हजारच्याही वर कॅब आहेत. पण सध्या या व्यवसायात २५ टक्के घट झाली आहे.