मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच कायम आहे. काँग्रेस आमदार अजूनही राजस्थानची राजधानी जयपूरमधल्या एका रिसॉर्टमध्येच आहेत. महाराष्ट्रात आज राष्ट्रवादी काँग्रेसला सरकार स्थापनेसाठीचं संख्याबळ सादर करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेकडेही लक्ष लागलं आहे.
पर्याय क्र. १
राष्ट्रवादीला आज रात्री ८.३० पर्यंत संख्याबळ सादर करण्याचे आदेश.
आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देऊ शकते.
मात्र शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय संख्याबळ गाठणं राष्ट्रवादीला शक्य नाही.
शिवसेना मुख्यमंत्रीपदाची मागणी करू शकते. मात्र राष्ट्रवादीनं ते मान्य करायला हवं.
पर्याय क्र. २
राष्ट्रवादी सरकार स्थापन करू शकले नाही तर राज्यपाल काँग्रेसला निमंत्रित करू शकतात.
त्यानंतर राष्ट्रवादीप्रमाणंच काँग्रेसलाही शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय काहीही करणं अशक्य.
काँग्रेस विचारसरणीनुसार काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही.
पर्याय क्र. ३
काँग्रेस व राष्ट्रवादी सत्ता स्थापनेस नकार देतील.
राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करतील.
मात्र काँग्रेसनं शिवसेनेचा पाठिंबा मागितल्यास उद्धव ठाकरे पाठिंबा देऊ शकतील.
पर्याय क्र. ४
पूर्ण संख्याबळाशिवाय भाजप सत्ता स्थापन करणार नाही. त्यानुसार भाजपनं सत्ता स्थापनेस नकार दिला आहे.
भाजप दुसऱ्या पक्षाच्या पाठिंब्यानं सत्तेत येऊ शकते. राष्ट्रवादीनं पाठिंबा दिल्यास असं होऊ शकतं.
पर्याय क्र. ५
राष्ट्रपती राजवटीनंतरही कुठलाही पक्ष सत्ता स्थापन न झाल्यास राज्यपाल पुन्हा निवडणुका जाहीर करू शकतील.