भाजपाला ''मी...मी'' संस्कृती मान्य नाही, ''आपण...आपण'' मान्य आहे - पंकजा मुंडे

भाजपाला आपण संस्कृती मान्य आहे, मी मी संस्कृती मान्य नाही, तसेच मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही

Updated: Jul 9, 2021, 02:45 PM IST
भाजपाला ''मी...मी'' संस्कृती मान्य नाही, ''आपण...आपण'' मान्य आहे - पंकजा मुंडे title=

मुंबई : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रीपद मिळेल असं म्हटलं जात असताना, प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं नाही. यावर मुंडे बहिणी नाराज आहेत अशी चर्चा होती. यावर पंकजा मुंडे यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली, यावेळी पंकजा मुंडे यांनी प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी त्यांनी आपल्याला टीम नरेंद्र आणि टीम देवेंद्रमध्ये कोण आहे मला माहित नाही, भाजपाला आपण संस्कृती मान्य आहे, मी मी संस्कृती मान्य नाही, तसेच मंत्रिपद न मिळाल्याने आम्ही नाराज नाहीत, पण प्रीतम मुंडे यांची मंत्रिपदासाठी योग्यता आहे हे देखील स्पष्ट केलं आहे.राजकारण माझ्यासाठी व्यवसाय नाही, तर माझ्यासाठी एक व्रत असल्याचंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

टीम नरेंद्र टीम देवेंद्र

भाजपाचे जे टीम देवेंद्रमध्ये गेले, त्यांचाच टीम नरेंद्रमध्ये समावेश झाला, असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, असा प्रश्न पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ''मला माहित नाही, टीम देंवेंद्रमध्ये कोण आहेत, टीम नरेंद्रमध्ये कोण आहेत. हे मला माहित नाही, आणि भारतीय जनता पार्टीला हे मान्य नाही ना, टीम देवेंद्र, टीम नरेंद्र''. 

मी मी संस्कृती भाजपाला मान्य नाही

यावर आणखी पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ''भाजपाला राष्ट्र प्रथम,, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी, असं आमचं आहे, मी पणा आमच्याकडे मान्य नाही, भाजपाच्या संस्कृतीला मी मी मान्य नाही. मी पणा आमच्या संस्कृतीला मान्य नाही, आपण आपण, आम्ही आम्ही  असं मान्य आहे, म्हणून एखादी टीम पक्षाला मान्य आहे'', असं वाटत नाही.

पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला संस्कारात दिली

''मी आज एक सामान्य कार्यकर्ता आहे, मी आज कोणत्या पदावर नाही, आणि पक्षनिष्ठा माझ्या बापाने मला संस्कारात दिली आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी हे देशात नेतृत्व करत होते, तेव्हा राज्यात मुंडे आणि महाजन प्रयत्न करत होते. तेव्हा तळागाळातला एक एक व्यक्ती आणून, शून्यातून पक्ष उभं करण्यात आमचं योगदान आहे, आणि आमचे पक्षाशी संबंध नाही तर एक नातं आहे''.