Passport : पासपोर्ट व्हेरिफिकेशनबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय

Passport News : मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) मोठा निर्णय घेतला आहे. आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी (Passport Verification) पोलीस स्टेशनला....

Updated: Mar 12, 2022, 04:44 PM IST
Passport : पासपोर्ट व्हेरिफिकेशनबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय   title=

मुंबई : Passport News : मुंबई पोलिसांचा (Mumbai Police) मोठा निर्णय घेतला आहे. आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी (Passport Verification) पोलीस स्टेशनला तुम्हाला बोलावले जाणार नाही. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्याची वारी टळणार आहे. पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी पोलीस ठाण्यात न बोलावण्याचा मुंबई पोलिसांनी निर्णय घेतला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र, कागदपत्र अपूर्ण असल्यास पोलीस ठाण्यात जावे लागणार आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. हीच पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याची मागणी होत आहे. जर तुमची कागदपत्र अपुरी असतील किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलीस स्टेशनला बोलवले जाईल, असे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman  ) यांनी अर्थसंकल्प सादर करताना नागरिकांच्या सोयीसाठी सरकार 2022-23 पासून ई-पासपोर्ट सुरू करेल, अशी घोषणा केली होती. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की ई-पासपोर्ट सुरू करण्याच्या हालचालीमुळे एकूण नागरिकांचा याचा चांगला लाभ होईल, सुरक्षा वाढेल आणि सुरळीत आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ होईल.

एका अहवालानुसार, ई-पासपोर्ट रेडिओ-फ्रिक्वेंसी आयडेंटिफिकेशन (RFID) आणि बायोमेट्रिक्सचा वापर करून व्यक्तींची ओळख निश्चित करेल. चिप एम्बेडेड ई-पासपोर्ट पासपोर्ट धारकाचा वैयक्तिक डेटा -- जसे नाव, बायोमेट्रिक तपशील. चिपमध्ये छेडछाड झाल्यास, सिस्टम ते शोधण्यात सक्षम असेल आणि अशा परिस्थितीत पासपोर्टचे प्रमाणीकरण केले जाणार नाही, असे अहवालात म्हटले आहे.