मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढले

मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढलेत.

Updated: Oct 6, 2018, 07:51 AM IST
मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढले

मुंबई : मुंबईत पेट्रोलचे दर पुन्हा एकदा वाढलेत. पेट्रोल १८ पैशांनी महाग झालं असून मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर रु. ८७.१५  पैसे इतके झालंय. तर दुसरीकडे  शुक्रवारी  डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. यानंतर डिझेल ७० पैशांनी स्वस्त झालंय. सरकारने 1.5 रुपये एक्साइज ड्यूटी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे अर्थमंत्री अरूण जेटली यांनी सांगितले होते. तेल कंपन्या ही पेट्रोल आणि डिझेलवरील 1 रुपये कमी करणार आहेत. यामुळे ग्राहकांना एका लीटरमागे 2.50 रुपयांचा फायदा होणार आहे. याशिवाय केंद्र सरकार राज्यातील सरकारांना देखील 2.5 रुपयापर्यंत वॅट कमी करण्याची विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर राज्यातही पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. पुन्हा दरवाढ झाल्याने यांच्या आश्वासनाला हरताळ फासण्यात आलायं. 

जुन्या पंपांवर दोन आकडेच 

 बहुसंख्य पेट्रोल पंपाना अपग्रेड करण्याची गरज नाहीयं. पण जुन्या पेट्रोल पंपावर केवळ दोन आकड्यातल्याच किंमती दिसताहेत. येत्या दिवसात जर पेट्रोलच्या किंमतीत आणखी 10 रुपयांनी वाढ झाली तर जुन्या डिस्पेंसर्स वाल्या पंपांना अडचण होऊ शकते.  पण सध्या तरी पेट्रोल कंपन्यांना दरवाढ 100 पर्यंत पोहोचण्याची शक्यता वाटत नाही.

विमान प्रवासही महाग 

 विमानाच्या इंधनाचे दरही वाढलेत. आता विमानाचं इंधन 2  हजार 650 रुपये प्रतिकिलो लिटरला विकलं जाणार आहे.. हा दर एटीएफअंतर्गत करण्यात आला आहे, म्हणजेच विमान कंपन्या त्यांच्या तिकिट दरामध्ये वाढ करू शकणार आहेत. त्यामुळे विमान प्रवास महागणार आहे.