धक्कादायक! PFI च्या टार्गेटवर हिंदू समाजातील SC, ST, OBC, मोठा कट उघडकीस

पीएफआयने 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा कट आखल्याचा अहवाल

Updated: Sep 26, 2022, 02:25 PM IST
धक्कादायक! PFI च्या टार्गेटवर हिंदू समाजातील SC, ST, OBC, मोठा कट उघडकीस title=

PFI Issue : पीएफआय या इस्लामी संघटनेच्या (PFI Islamic Group) रडावर हिंदुत्ववादी संघटनांचे नेते होते अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. एटीएसने (ATS) महाराष्ट्रात केलेल्या कारवाईत काही पुरावे हाती लागले आहेत. त्यात आरएसएस (RSS) आणि भाजपसह (BJP) अन्य हिंदुत्ववादी संघटनांचे (Hindutva) नेते रडारवर होते अशी माहिती एटीएसच्या हाती लागली असल्याची सूत्रांची माहिती आहे. भारत 2047 पर्यंत इस्लामी राष्ट्र बनवण्याच्या कटाचा भाग म्हणून हिंदुत्ववादी नेत्यांना टार्गेट करण्यात येणार होतं असं समजतंय. 

पीएफआयचा कट
याशिवाय पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या टार्गेटवर हिंदू समाजातील एससी (SC) एसटी (ST) आणि ओबीसी (OBC) असल्याची माहिती समोर आलीय. आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातल्या हिंदूंना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं धर्मपरिवर्तन (Conversion) करण्याचा कट पीएफआय आखत असल्याचं दिसून येतंय. पीएफआयने 2047 पर्यंत भारत मुस्लीम राष्ट्र बनवण्याचा कट आखलाय असा गृहखात्याचा (Central Home Department) अहवाल आहे. आर्थिक संपन्न मुस्लिम पीएफआयला साथ देणार नाहीत याची पीएफआय नेत्यांना खात्री आहे. त्यासाठी गरीब मुस्लिमांना भडकवणे आणि आर्थिक मागास हिंदूंना टार्गेट करायला सुरूवात केलीय असं या अहवालात नमूद आहे. आरएसएसची प्रतिमा मलीन करण्याचा त्यांचा कट असल्याचं या अहवालात आहे. 

देशभरात PFIवर छापे
काही दिवसांपूर्वीच एनआयएने (NIA) देशभरात मोठी कारवाई केली. तसंच महाराष्ट्रातून PFI च्या 20 जणांना ताब्यात घेतलं. इस्लामिक संघटना पीएफआयवर नवी मुंबई, पुण्यासह देशभरात एनआयए, ईडीचे छापेमारी केली. राज्यात 20 तर देशभरातून 100 हून अधिक जणांना अटक करण्यात आली. पुण्यातून कौसर बागेत टाकलेल्या छाप्यातून पीएफआयचा महाराष्ट्र सचिव रजी अहमद खान आणि कय्यूम शेख यांना अटक करण्यात आली. 

दहशतवादी कारवाया, टेरर फंडींग, दहशतवाद्यांसाठी ट्रेनिंग कँप आयोजित करणे, बंदी असलेल्या कट्टर संघटनांमध्ये तरूणांची भरती करणे अशा कारणांखाली ही कारवाई करण्यात आली. एनआयएने 106 हून अधिक जणांना अटक करण्यासोबतच डिजिटल गॅजेट्स, कागदपत्र, काही शस्त्र तसंच रोकडही जप्त केली होती.