महाराष्ट्र दिनी मोदींनी दिल्या महाराष्ट्राला शुभेच्छा

पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेला ट्विटच्या माध्यमातून महारष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. 

Updated: May 1, 2018, 10:46 AM IST
महाराष्ट्र दिनी मोदींनी दिल्या महाराष्ट्राला शुभेच्छा title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या स्थापना दिनाची तारखी एकच असल्याने मोदींनी गुजराती जनतेलाही आजच शुभेच्छा दिल्या आहते. या शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी ट्विटरचा आधार घेतला.

काय म्हटले आहे ट्विटमध्ये 

महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ! महाराष्ट्राच्या निरंतर प्रगती आणि समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो. हे राज्य प्रगतीच्या नव्या उंचीवर पोहोचावे आणि देशाच्या विकासाच्या प्रवासात त्याचे योगदान असेच वाढत जावे, अशा शब्दांत मोदींनी राज्यातील जनतेला ट्विटच्या माध्यमातून महारष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.