मुंबई : 'भाजप नेते किरिट सोमय्या यांनी मला अटक करण्याचे गृहमंत्र्यांनी आदेश दिले असल्याचा' दावा ट्वीट करून दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर जाणार आहेत. 'माझा कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी तसेच हसन मुश्रीफ यांचा घोटाळा दाबवण्यासाठी घरातून अटक करण्याची गृहमंत्र्यांनी आदेश दिल्याचा' दावा सोमय्या यांनी केला आहे.
किरिट सोमय्या यांच्या घराबाहेर साधारण 100 पोलिसांनी वेढा दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोमय्या उद्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील कथित घोटाळा प्रकरणी कोल्हापूर येथे जाणार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारकडून दडपशाही सुरू असून मुश्रीफ यांचा घोटाळा दाबण्यासाठी मला अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
ठाकरे सरकारची दडपशाही, माझा घराखाली पोलिसांची गर्दी, माझा कोल्हापूर दौरा थांबविण्यासाठी, हसन मुश्रीफ घोटाळा दाबण्यासाठी घरातून अटक करण्याचे गृहमंत्री आदेश
मी मुलुंड निलम नगर हून ५.३० ला निघणार, आदी गिरगाव चौपाटी गणेश विसर्जन आणि तिथून ७.१५ वाजता CSMT स्टेशन महालक्ष्मी एक्स्प्रेस pic.twitter.com/lct8lx580v
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) September 19, 2021
तुम्ही कुठेही जाऊ शकता नाही. असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. घोटाळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची लोकं करतात. अनिल देशमुख आणि पोलीस कमिशनर फरार आहेत. उलटपक्षी जनतेसाठी लढणाऱ्या किरिट सोमय्याला अटक करतात? ही ठाकरे सरकारची ठोकशाही आहे. मी उद्या महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरात जाणार आहे. अंबाबाईचं दर्शन घेणार आहे. ठाकरे सरकारने कितीही अडवलं तरी कोल्हापूर दौरा करणार असल्याची प्रतिक्रिया किरिट सोमय्या यांनी दिली आहे.
कोल्हापूर प्रशासनाचे आदेश